Maharashtra Election : एक्झिट पोल एक्झॅट नाहीत, आम्ही 160 जागा जिंकणार असून सत्ता स्थापन करणार असल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी व्यक्त केलायं. राज्यात विधानसभेसाठी(Assembly Election) मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतिक्षा आहे. उद्या मतमोजणी होणार असून निकालानंतर उमेदवारांनी तत्काळ मुंबईत येण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून देण्यात आलेत तर काँग्रेस नेत्यांकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे.
मतमोजणी अवघ्या काही तासांत, प्रशासन सज्ज; अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक फेऱ्या कुठे होणार?
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार असून आम्ही 160 जागा जिंकणार आहोत. लोकांना बदल हवा होता म्हणूनच राग व्यक्त करण्यासाठी, जनतेने भरभरुन मतदान केलंय. हे एक्झिट पोल आहेत एक्झॅट पोल नाहीत. अनेकदा अंदाज चुकलेले आहेत, आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलायं.
महिलांच्या मतदानात वाढ, महायुतीचचं सरकार येणार, CM पदावरही भाष्य; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
उद्या राज्यात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. हॅकर्सच्या माध्यमातून मतमोजणीवेळी गैरप्रकार होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. प्रेस असे स्टीकर लावून काही अनधिकृत गाड्या आणि व्यक्ती 100 मीटरच्या परिसरात येण्याची शक्यता असल्याची माहिती आहे, इंटरनेटच्या माध्यमातून होणारे गैरप्रकारही टाळले गेले पाहिजे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
एक्झिट पोलची आकडेवारी येताच फडणवीस संघ कार्यालयात दाखल, मोहन भागवतांशी राजकीय खलबतं…
सत्ताधाऱ्यांनी जनतेला लाडकी बहिण योजनेचे पैसे दिलेत पण महागाई वाढवून परत घेतले. तेलाचे दर, वीजबिल, वाढले. आता महाविकास आघाडी जनतेला तीन हजार रुपये देणार आहे. महिलांनी आम्हाला मतदान केलंय निवडणूक संपल्यानंतर आता हिंदू वेगैरे विषय सत्ताधारी सोडून देतील, धार्मिकतेला जनतेने थारा दिलेला नाही, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.