Ajit Pawar Group Candiate List : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. अजितदादांच्या पहिल्या यादीत नव्या पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आलीयं. यामध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले हिरामण खोसकर (Hiraman Khose) यांना इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून पाथरी मतदारसंघातून विटेकरांना उमेदवारी देण्यात आलीयं.
अभिनेता अंकित मोहन म्हणतोय ‘झालोया मी पैलवान…’; बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित!
सुलभा खोडके यांना अमरावती मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीयं. खोडके यांनी आजच अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करताच त्यांना उमेदवारी देण्यात आलीयं. तर मुंब्रा-कळवा मतदारसंघातून नजीब मुल्ला, पाथरी मतदारसंघातून निर्मला विटेकर, नवापूर मतदारसंघात भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आलीयं.
शेअर बाजारातील घसरण कायम; सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजची स्थिती काय?
सात विद्यमान आमदारांना वेटिंग :
अजित पवार यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये सात विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. यामध्ये मनोहर चंद्रिकापूरे, सुनील टिंगरे, बाबासाहेब आजबे, बबनराव शिंदे, राजेंद्र शिंगणे, संजय शिंदे, देवेंद्र भुयार यांचा समावेश आहे.
भारताला धक्का! कॉमनवेल्थ स्पर्धांतून हॉकी, क्रिकेट, कुस्ती अन् बॅडमिंटन आऊट
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाहीये. त्यामुळे नाराज टिंगरे तातडीने पुण्याहून मुंबईला अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना होणार असल्याचे सांगिले जात आहे.
दरम्यान, पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असून, स्वतः अजित पवार बारामतीमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पिंपरीतुन राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, मावळमधून सुनील शेळके आणि येवल्यातून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आलीयं.