‘तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या?, अयोध्या पौळ यांची शिंदे गटाच्या आमदारावर बरसल्या

Ayodhya Paul On Santosh Bangar : दिवसेंदिवस शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष वाढत आहे. सातत्याने हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसतात. दरम्यान, उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सातत्याने सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची विदर्भात सभा झाली होती. आता ते 27 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा घेणार आहेत. […]

Sana Khan (7)

ayodhya paul

Ayodhya Paul On Santosh Bangar : दिवसेंदिवस शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष वाढत आहे. सातत्याने हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसतात. दरम्यान, उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सातत्याने सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची विदर्भात सभा झाली होती. आता ते 27 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा घेणार आहेत. या सभेत ते संतोष आमदार यांच्यासह शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाचे नेत्या अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचे नाव न घेता ‘गद्दार दादुल्या’ अशी टीका केली आहे.

अयोध्या पौळ यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, ‘कळमनुरी विधानसभेचा गद्दार व त्याचे चेलेचपाटे त्यांनी लावलेल्या बॅनरचे व्हिडिओ मला पाठवत आहेत. गद्दारांसह सर्व चिरकुटांना मी सांगू इच्छिते की, मार्केटिंग आणि बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे. कारण जो बापमाणूस हिंगोलीत येतोय, तो तळपता सुर्य आहे, एक ब्रॅंड आहे. त्यांना मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात ठणकावल.

त्यांनी लिहिलं की, उध्वद ठाकरे या 24 कॅरेट अस्सल ब्रॅंडचं मार्केट डाऊन करण्यासाठी स्वयंघोषित जागतिक स्तराची महाशक्ती अपयशी ठरतेय. तिथं तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या? हिंगोलीत स्वयंघोषित महाशक्तीचा बाप येतोय बाप, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

मर्जीची बदली नोकरीवर बेतली! कंत्राटदारांनी डीजे लावून वरात काढल्यानं अभियंत्याचं निलंबन 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा न मिळाल्यास मिशी ठेवणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अयोध्या यांनी संतोष बांगर यांना त्यांच्याच या आव्हानाची आठवण करत मिशा कधी काढणार? असा खोचक सवाल केला होता.

दरम्यान, आता पुन्हा एकदा अयोध्या पौळ यांनी गद्दार दादुल्या अशी टीका केली आहे. त्यामुळं संतोष बांगर आणि शिंदे गट नेमकं काय प्रत्युत्तर देतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version