मर्जीची बदली नोकरीवर बेतली! कंत्राटदारांनी डीजे लावून वरात काढल्यानं अभियंत्याचं निलंबन

मर्जीची बदली नोकरीवर बेतली! कंत्राटदारांनी डीजे लावून वरात काढल्यानं अभियंत्याचं निलंबन

जालना : अन्य ठिकाणी झालेली बदली, पुन्हा आधीच्या ठिकाणी म्हणजे जालना येथील महावितरण कार्यालयात झाल्यानं एका अभिनंत्याने वाजत गाजत डीजे मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक या सहाय्यक अभियंत्याला चांगलीच महागात पडली आहे. विनापरवाना मिरवणूक, वाहतुकीस अडथळा या कारणांमुळं या अभियंत्यांसह 20 ते 30 जणांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा तर दाखल झालाच आहे. सोबतच नागरिकांनी मिरवणुकीवर टीका केल्यानंतर महावितरणने (mahavitran) अभियंत्यालाही निलंबित केले आहे. प्रकाश चव्हाण (Prakash Chavan) असं या अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण हे यापूर्वी जालन्यातील कन्हैयानगर भागातील महावितरण कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्याविरोधात ग्राहक व नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे महिनाभरापूर्वी त्यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली होती. मात्र तेथून त्यांची पुन्हा बदली झाली. ही बदली जालन्यातील महावितरणच्या फेज 3 मध्ये झाली. या बदलीमुळे चव्हाण व त्यांच्या अखत्यारितील कंत्राटदार खूश झाले आणि कॉन्ट्रॅक्टरांनी चव्हाण हे शहरात दाखल होताच त्यांनी पोलिसांची परवानगी न घेता डीजेवर डान्स करत मिरवणूक काढली.

Video : राष्ट्रवादीच्या टीझरने विरोधकांची धाकधूक; ‘आपलं नाणं खणखणीत, भल्याभल्यांचा आवाज बंद करणार’ 

चव्हाण यांच्या समर्थकांनी त्यांच्या डोक्याला फेटा बांधून, पुष्पहार घालून, फटाके फोडून, ​​खांद्यावर उचलून डीजेच्या तालावर ठुमके लावून चांगलाच जल्लोष साजरा केला. सध्या जिल्ह्यात पूर्वपरवानगीशिवाय डीजे वाजविण्यास बंदी आहे. तरीही त्यांनी डीजेवर मिरवणूक काढली. त्यामुळं वाहतुकीला अडथळा झाला. वाहतुकीला अडथळा निर्माण करून त्यांनी जिल्हाधिकारी जालना यांचे कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासह अन्य 20 ते 30 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 143, 188, 283 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच डीजे मिरवणूक प्रकरणानंतर शहरातील नागरिकांकडून महावितरणवर झालेल्या टीकेनंतर महावितरणने प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही मिरवणूक अखेर या सहाय्यक अभियंत्यांच्या चांगलीच अगटल आलेली पाहायला मिळालेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube