Download App

भुजबळांचा विरोध वैफल्यातून; ‘कुणबी’ नोंद सापडल्यास OBC पासून कोणीही थांबवू शकत नाही

  • Written By: Last Updated:

Bachchu Kadu : मराठा आरक्षणवरून (Maratha Reservation) राज्यात मराठा आणि ओबीसी असा वादंग निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केला आहे. यावरून आता प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भुजबळांचा विरोध हे त्यांचं वैफल्य आहे. काही लोक मतांचा हिशोब करून आपली राजकीय पोळी शेकत आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई’; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांचं स्पष्टीकरण 

आमदार बच्चू कडू यांनी मुंबई तकला मुलाखत दिली. यावेळी त्यांना मराठा आरक्षणाबाबत असलेल्या भुजबळांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, राजकीय लोक हे टाऴूवरचे लोणी खाणारे असतात. कोण मरतं, यापेक्षा आपलं काय जमतं ही मानसिकता नेत्यांमध्ये खूप आहे. या भूमिकेमुळं अख्खा महाराष्ट्र, देश बुडाला तरी नेत्यांना त्याची पर्वा नसते. आरक्षणाच्या मुद्दावर एक किटली गरम नाही तर हजारो किटल्या गरम झाल्या आहेत. प्रत्येकजण आपली किटली गरम करतोय, अशी टीका त्यांनी मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर केली.

Bigg Boss 17: सुशांत सिंगच्या आठवणीत रडताच अंकिता ट्रोल, चाहत्यांनी टोलर्संना दिलं सडतोड उत्तर

आमदार कडू पुढे म्हणाले, छगन भुजबळ यांच्या मधल्या काळात अनेक मोठ्या संधी निघून गेल्या आहेत. त्यामुळं येणारी संधी आपण गमावू नये, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहेत. सध्या भुजबळांची राजकीय स्थिती कमी होत चालल्याचं दिसतं. त्यामुळं ते वैफल्य आहेत आणि याच कारणामुळं त्यांच्याकडून मराठा आंदोलनाबाबत आणि ओबीसी आरक्षणाबाबत अशी वक्तव्य केली जात आहेत.

ओबीसीतून आरक्षण द्यायला भुजबळांचा विरोध होतो याविषयी विचारलं असता कडू म्हणाले, सध्या ज्या नोंदी भेटत आहेत, त्या निजामशाही नोंदी भेटत आहे. ह्या 1881 पासूनच्या निजामकालीन नोंदी आहे. तरीही भुजबळ म्हणतात, एवढ्या नोंदी कशी काय मिळत आहे. हे म्हणजे समुद्रात जायचं आणि विचारायचं एवढं पाणी कसं काय? असं कडू म्हणाले. ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी भेटतील त्यांना कुणाही आरक्षणापासून अडवू शकत नाही. सरसकट मराठ्यांन कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं कडू म्हणाले.

कडू म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानं ओबीसी नेते आपापला समाज घेऊन उभे राहिले. भाजपसारखा पक्ष ओबीसींची बाजू घेत आहे. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजासाठी पुढे आले आहेत. मात्र, मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात अडचण नाही. मात्र, काही पक्ष आणि नेते मतदााच्या पेटीची हिशोब करून आरक्षणाची शेकोटी पेटवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags

follow us