Download App

विधवा ऐवजी ‘गंगा भागिरथी’ शब्दावर बच्चू कडू म्हणाले, शब्द कोणताही असो, दु:ख नष्ट झाले पाहिजेत

  • Written By: Last Updated:

Bachchu Kadu on Mangal Prabhat Lodha Decision : समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना सुरू केली. त्यामुळं अपगांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आता याच धर्तीवर राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढं विधवांच्या (widow) नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनीही यांनीही या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. शब्द कोणताही असो, दु:ख नष्ट झाले पाहिजेत, असं बच्चू कडू यांनी सांगिलते.

बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विधवा महिलांना एकल महिला म्हणता येईल. शब्द कोणताही असू द्या, दु:ख नष्ट झालं पाहिजे. माझं म्हणणं आहे, अपंगाऐवजी दिव्यांग शब्द दिला आहे. पण दिव्यांग शब्द दिल्यानंतर दिव्यांचे दु:ख, वेदना, यातना कमी झाल्या आहेत का? आपण सगळे नावात गुंतलेले लोक आहोत. पण आम्ही नावात आम्ही भरकटत नाही. आम्ही भरकटणारे लोक आहोत. नावामध्ये आम्हाला काही फार रस नाही आहे, असं त्यांनी सांगिललं.

ते म्हणाले की, बाबासाहेब यांचे नाव आंबेडकर आहेत म्हणून आम्ही सोबत आहोत असं नाही. बाबासाहेबांचे विचार हे या देशालाच नाही तर जगाला जागवणारे आहेत, म्हणून आम्ही सोबत आहोत.

दुर्दैवी घटना! ड्युटीवर निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूने गाठले

लोढा यांनी प्रधान सचिवांना आदेश दिले होते की, समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फ अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातून समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग असा शब्दप्रयोग रूढ केला. त्यामुळं दिव्यांग बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत आहेत. याच धर्तीवर राज्यातील विधवा महिलांन सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबातच परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असे आदेश दिले.

दरम्यान, विधवांना ‘गंगा भागिरथी’ असं संबोधल्यानं नेमका काय फरक पडणार आहे? विधवा महिलांचा ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करून समाजात ओळख करून देण्याचा उद्देश काय? त्यापेक्षा विधावांचे प्रश्न सोडवण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, असं काही प्रागतिक विचारांच्या महिला सांगत आहेत.

दरम्यान, लोढा यांनी घेतलेल्या यापूर्वीच्या काही निर्णयावरूनही वाद पेटला होते. त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची घोषणा केली होती. मात्र, राज्य सरकार हे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देते, आणि दुसरीकडे विरोधी भूमिका घेत आहे, असा आरोप विरोधकांनी घेतला होता. त्यामुळं सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. दरम्यान, आता गंगा भागिरथी या शब्दाविषयी सरकार काय निर्णय घेते, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

Tags

follow us