Bachchu Kadu on Mahayuti : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या महायुतीचा घटक आहेत. मात्र अनेकवेळा त्यांनी महायुतीवरच (Mahayuti) टीका केली. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे बच्चू कडू महायुतीपासून वेगळे होऊन महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा त्यांनी महायुतीवर जोरदार टीका करत महायुतीतील सर्वच पक्ष नाराज आहेत, आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचंही अस्तित्व आहे, अशा शब्दात खडेबोल सुनावले आहेत.
‘महायुतीतील सगळेच पक्ष नाराज, आमचे पक्ष लहान असले तरीही…’; बच्चू कडूंचे भापजवर टीकास्त्र
आज माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांनी महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, महायुतीच्या बैठकीचा निरोप आज सकाळी वेळेवर आला. त्यामुळं मला जाणं जमलं नाही. बऱ्याचदा बैठकीचे विषय काय असतात, हेही ठाऊक नसतं. ते डायरेक्ट बैठकीला बोलावतात. भाजप सध्या सर्वजण आपल्यासोबत आहेत असे गृहीत धरून भाजप काम करत आहे. पण हे चुकीचे आहे. आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचं अस्तित्व आहे. आमचा पक्ष महाराष्ट्रात आहे, तरीही जिल्हा नियोजन समिती असेल किंवा निराधार योजना असेल यासंदर्भात कुठलीही विचारणा होत नाही. त्यामुळं सगळेच पक्ष नाराज आहेत, असं कडू म्हणाले. पक्ष मोठा झाला म्हणजे लहान पक्षांना विसरू नये. कारण त्यांच्या शिवाय तुमचे काम पूर्ण होणार नाही, असंही ते म्हणाले.
टोल वसुली रद्द करा, अन्यथा पंतप्रधानांचे काळे गुलाबांनी स्वागत करू, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
किती जागा देणार हे भाजपने स्पष्ट करावं
यंदा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, अद्याप महायुतीचं जागावाटप ठरलं नाही. त्यावरूनही कडू यांनी भाष्य केलं. आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. सर्वच घटक पक्ष नाराज आहेत.मी मुख्यमंत्री किंवा इतर कुणाशाही जागा वाटपाबाबत बोलणार नााही. हे सोबतच्या दोन्ही पक्षांनी ठरवावं की, लहान पक्षांना कशा पद्धतीन सोबत घ्यावं. त्यांनी जर सोबत घेतल नाही तर तइतर पक्षांची कमतरता नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
आधी चर्चा करा, मग दौरा
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावावी. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची काळजी घ्यावी. युती धर्म पाळला गेला पाहिजे. दोन्ही बाजंनी पाळला गेला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी आधी घटक पक्षांशी चर्चा करून मगच महाराष्ट्र दौरा सुरू करावा, असंही कडू म्हणाले.