Download App

Bachhu Kadu : …तर ‘आपको हम भुल जायेंगे’; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना थेट पाठिंबा काढण्याचा इशारा!

  • Written By: Last Updated:

Bachhu Kadu : नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. यावेळी कडू यांनी एकनाथ शिंदे यांना थेट सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिलाय. पुण्यामध्ये दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात ते बोलत होते. तेव्हा त्यांनी हा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना थेट पाठिंबा काढण्याचा इशारा!

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगाना निधी न दिल्यास आम्ही तुमच्या सोबत आमदार असलो तरी ‘आपको हम भुल जायेंगे’ दिव्यांग बांधव संख्या ५ टक्के झाली आहे,५ टक्के बजेट दिलं पाहिजे ते बजेट सध्या होत नाही,आता तेवढ बजेट दिलं नाही तर भुलाव लागेल. असं म्हणत कडू यांनी दिव्यांगाच्या प्रश्नावरून कडू यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला.

काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा

तसेच ते म्हणाले की, जरांगेच्या मागणीने मोठा गोंधळ होईल. आई वडील असेल तर वडीलांचा धर्म लागतोय. राणा दाम्पत्यच उदाहरण त्यांनी दिलं. हा मोठा चिंतेचा विषय आहे.यावर जरांगे पाटील यांनी विचार करावा. यातून मार्ग काढावा 24 डिसेंबरच्या आत काही लोकांना आरक्षण भेटलच आहे. हे त्याच्या आंदोलनाच यश आहे. म्हणून मुख्यमंत्री यांनी भूमिका घेतली. कुणबीची प्रमाणपत्र दिली. तर सरकार सरकारची भूमिका निभावत असतं. आंदोलक म्हणून जरांगे त्याची भूमिका निभावत आहे. आता फक्त काना मात्र प्रश्न आहे तो चर्चेतून सुटला पाहिजे.

ईश्वर के घर देर है अंधेर नहीं..! साक्षीनंतर बजरंग पुनियाचाही मोठा निर्णय…

तर खासदारांच्या निलंबनावर कडून म्हणाले की, पहिलीच वेळ आहे एवढ्या मोठ्या संख्येने निलंबित खासदार होण्याची त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच आहे. हा अतिरेक होऊ नये. संसदेच बळ हे राजकीय बळ म्हणून भाजप वापरत आहे. संसदेत बळ सामान्य माणसासाठी वापरले गेले पाहिजे. सगळ्यांना सरसकट निलंबित करण म्हणजे उद्या तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल तसे करू नये.

Tags

follow us