Badlapur Rape Case : मागील काही दिवसांपासून राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. बदलापुरातल्या एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (Badlapur Rape Case) शिपायाने अत्याचार केल्याचं समोर आलं. या घटनेप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. आता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आलीयं. शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची खरी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलीयं. त्यामुळे एकच खळबळ उडालीयं.
दीपक केसरकर या घटनेबद्दल बोलताना म्हणाले, प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून बदलापूरमधील शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहेत. या घटनेप्रकरणी शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली असून या चौकशीत सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं समोर आलं असल्याचं केसरकरांनी सांगितलंय.
Video : महायुतीत पुण्यात ठिणगी; राष्ट्रवादीचे आमदार टिंगरे यांच्यावर भाजपच्या मुळीक यांचा वार
तसेच शाळांमध्ये मदतकक्ष सुरु करीत असून आम्ही लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेणार असून पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तसेच तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेत असल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलंय.
10 लाखांची मदत अन् शिक्षणाची जबाबदारी
बदलापूर घटनेतील पीडित कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार असून जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झालायं, तिला 3 लाख रुपयांची मदत करणार आहे. तर दोन्ही मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी आम्ही उचलणार आहोत. त्यासाठी लागणारी मदत दर महिन्याला चेक स्वरुपात देण्यात येणार असल्याचं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. या मुद्द्यावरून पालक आक्रमक झाले आहेत. (SIT Report) त्यानंतर सरकारने याप्रकरणी दखल घेत एसआयटीची स्थापना केली होती. या एसआयटीने आपला प्राथमिक रिपोर्ट सादर केला असून यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी अक्षय शिंदे याने एकवेळा नाही तर अनेकवेळा चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. याशिवाय तो कोणत्याही बंधनाशिवाय चिमुकलींपर्यंत पोहोचू शकत होता. त्याला कोणताही अटकाव करण्यात आला नव्हता, असं एसआयटी रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या माहितीनंतर मोठा संताप आता पाहायला मिळत आहे.