Download App

‘धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करा’, तृप्ती देसाईंची मागणी

  • Written By: Last Updated:

Shirdi Sai Baba : बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) महंत पंडित धीरेंद्र शास्त्रीजी (Dhirendra Shasri) साईबाबा हे लाखो- करोडो भक्तांसाठी देवचं आहेत, तुमचा सनातन धर्म कोणता आहे. आणि तो साई- बाबांना का देव मानत नाही. मला माहित नाही. परंतु जे हजारो- लाखो भक्त साई बाबांना देव मानतात, त्याची श्रद्धा दुखावली आहे. त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई (Tripti Desai) यांनी केली.

Trupti Desai on Bageshwer Baba : बागेश्वर बाबा पुन्हा बरळले, तृप्ती देसाई भडकल्या | LetsUpp Marathi

धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काय गरज आली, ते अगोदरच जोकर सारखे टाळ्या वाजवत असतात. मधेच हसत असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला जोकर देखील म्हणार नाही, कारण आमचा धर्म आम्हाला असे काही शिकवत नाही. आणि आम्ही माणुसकी हा धर्म आम्ही मानतो, ते आम्हाला कोणाच्यातच भेदभाव करायला शिकवत नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने साई भक्तांची माफी मागितली पाहिजे, आणि धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. कारण लाखो साई भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी केली.

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

जबलपूरमध्ये सुरु असलेल्या एका कार्यक्रमानिमित्त धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आपल्या धर्माच्या शंकराचार्य यांनी साईबाबांना देवाचे स्थान दिलेलं नाही. आणि शंकराचार्य यांचे म्हणणे समजून घेणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. त्यामुळे साई हे देव नाहीत हे शंकराचार्य यांचे विधान प्रमाण असल्याचे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.

Tags

follow us