Balasaheb taught us to give replay Shambhuraj Desai’s response on debate with Anil Parab in assembly : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं मिळाली पाहिजेत. या मुद्द्यावरून हा वादंग झाला. या वादानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, बाळासाहेबांनी आम्हाला आरे ला कारे बोलायला शिकवलंय.
सभागृहातील बाचाबाचीनंतर शंभूराज देसाई म्हणाले…
विधान परिषदमध्ये मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं मिळाली पाहिजेत. या मुद्द्यावरून प्रश्न उत्तर सुरू होते.तेव्हा मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचं समाधान झालं नाही. त्यावर चित्रा वाघ यांनी नार्वेकरांना प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या की, यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असलं कोणतंही धोरण आणलं नव्हतं.
मोठे स्टार, अमाप पैसा पण सट्टेबाजीला केलं प्रमोट.. ‘त्या’ सेलिब्रिटींचे उद्योग ईडीच्या रडारवर
यावरून अनिल परब यांना राग आला आणि यासंदर्भामध्ये तुम्ही सुद्धा तुम्ही का नाही बोललात. त्यावर तुम्ही सुद्धा राज्यमंत्री होते. असं म्हणत अनिल परबांनी गद्दार हा शब्द वापरला. तेव्हा मी सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं. त्यावरून आमच्यात वाद, बाचाबाची झाली.
पण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आम्ही पण निवडून आलेली लोक आहोत. आम्हाला देखील मोठ्या आवाजात बोलता येते. आमचा अपमान करणार आणि आमची बदनामी करत असेल आम्ही ते सहन करणार नाही.त्यांनी अरे तुरे ची भाषा वापरली. म्हणून आम्हीही वापरली.त्यांनी जर पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण दुप्पट वाढवू.बाळासाहेबांनी आम्हाला आरेला का रे बोलायला शिकवलं आहे. असं उत्तर देसाईंनी दिलं.
नेमकं काय म्हणाले मंत्री शंभूराज देसाई?
विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली. यावेळी परबांना उत्तर देताना देसाईंची जीभ घसरली. ते म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं तुम्ही दिले नाही. तुमचं मराठी माणसांविषयी प्रेम किती खोटं आहे. हे तुम्ही स्विकारा. तू गद्दार कुणाला म्हणतो. बाहेर ये तुला दाखवतो. तू कुणाचा बूट चाटत होता.असं म्हणत देसाई यांची सभागृहात जीभ घसरल्याचं पाहायला मिळाली.
काय म्हणाले होते अनिल परब?
मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं मिळाली पाहिजेत. या मुद्द्यावरून परब आणि देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते. असं वक्तव्य अनिल परब यांनी बसून केलं होतं. त्यानंतर परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. या वादानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. शब्द रेकॉर्डवरून काढण्यात आले.