Download App

शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही; Balasaheb Thorat यांचा विखेंवर निशाणा

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : उपचारानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे संगमनेरमध्ये (Sangamner) दाखल झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी थोरात यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. आपल्या शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही. एकही दिवस खाडा न करता ते टीका करतात. अशा शब्दात थोरात यांनी विखेंवर निशाणा साधला.

संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरातांच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरातांसाठी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला थोरात यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.

Educational News : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद राहण्याची शक्यता…

थोरात म्हणाले, अलीकडच्या कालखंडात आपले शेजारचे मंत्री, त्यांना आपल्या शिवाय करमत नाही. कुठेही गेले तरी मी त्यांच्या बरोबर असतो, अनेक विषय घेऊन बोलतात. यामुळे कार्यकर्त्यांना त्रास होतोय, पण फार काळ हा त्रास सहन करावा लागणार नाही. जिद्दीने लढू असं म्हणत थोरातांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

तसेच विखेंवर भाष्य करताना थोरात म्हणाले, मुळात ते राज्याचे मंत्री असले तरी फारसे कोठे जात नाहीत. याच भागात फिरतात. कोठे गेलेच तर तेथे देखील ते माझ्याविषयावरच बोलतात. संगमनेर तालुक्यात त्यांचे काय काय उद्योग सुरू आहेत, तेही आम्हाला माहिती आहे. त्यांचा हा त्रास आता फारकाळ चालणार नाही. दहशतीने मतदारसंघावर वर्चस्व मिळविले असेल तर ते इतर तालुक्यांत मिळविता येणार नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे. अशा शब्दात थोरात यांनी विखेंना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

Tags

follow us