Download App

Balasaheb Thorat : सावरकरांबाबत वैचारिक मतभेद असले तरी मविआ आमची भक्कम

  • Written By: Last Updated:

Balasaheb Thorat on Sawarkar : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली होती. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे राज्यातील महत्वाचे नेते या सभेला हजर होते. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते. मात्र, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या सभेला गैरहजर होते. दरम्यान, यावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले. ठाकरे हे सावरकरांच्या बाजूने भूमिका घेतात, आणि राहुल गांधी हे सावरकरांना (Savarkar) विरोध करतात, त्यामुळं ठाकरेंच्या सभेला पटोले आले नाहीत. परिणामी, महाविकास आघाडीत बिघाडी आहे, असंही बोलल्या गेलं. दरम्यान, आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी याबाबत वक्तव्य केलं. महाविकास आघाडी भक्कम असल्याचं त्यांनी सांगितलं.

थोरात यांनी याविषयी बोलतांना सांगितलं की, आमचे पक्ष वेगळे आहेत आमचे. त्यामुळं आमच्यात मतमतांतरे आहे. पक्ष वेगळे असल्यानं आमच्या भूमिकाही निराळ्या आहेत. ते साहजिक आहे. खरंतर काही विषय हे तात्विक असतात. वैचारिक असतात. त्यामुळं त्याला वैचारिक पध्दतीने उत्तर दिलं पाहिजे. पक्ष असल्यामुळं विचार वेगळे असू शकतात. त्याचा उगाच बाऊ करण्याची गरज नाही. शेवटी आमची आघाडी भक्कम आहे. आणि आम्ही एकत्र काम करणार आहोत, असं थोरात यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काही वादग्रस्त उद्गार काढले होते. त्यामुळं देशात राजकीय वातावरण पेटलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राहुल यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना राहुल गांधी मी माफी मागणार नसल्याचं सांगितलं होते. ते म्हणाले होते की, मी बोलतच राहणार. मला जेलमध्ये टाका. माझी खासदारकी रद्द करा. कायमस्वरुपीही माझं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केलं तरी मी बोलतच राहणार. मी कदापिही माफी मागणार नाही. कारण मी राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, असं म्हणत भाजपला डिवचलं होतं.

देशभरामध्ये भितीचे व दडपशाहीचे वातावरण; खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

त्यानंतर भाजपने सावरकर गौरव यात्रा काढली होती. दरम्यान, महाविकास आघाडीने वज्रमुठ सभा घेतली. या सभेत ठाकरे हे सावरकरांविषयी भाजपला अनुकूल भुमिका घेतील. आणि राहुल गांधी हे सावरकरांना विरोध करत असतात. त्यामुळं महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर जायला नको, असं वाटल्यानं पटोले सभेला गैरहजर राहिले अशी चर्चा सुरू होती. परिणामी, महाविकास आघाडीत मतभेद असून महाविकास आघाडी टीकणार नाही, आघाडीत बिघाडी आहे, असं बोलल्या जातं होतं.

दरम्यान, आता थोरातांनी आमच्या वैचारीक मतभेद असले तरी महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही एकत्र काम करणार आहोत, असं सांगितलं. त्यामुळं तुर्तास महाविकास आघाडीत बिघाडी या चर्चेला विराम मिळाला आहे.

 

Tags

follow us