देशभरामध्ये भितीचे व दडपशाहीचे वातावरण; खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP leader Eknath Khadase : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही काही रॅपरने राज्य सरकारच्या विरुद्ध रॅप केले आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह शब्द असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधानांच्या डिग्रीवरुन देखील त्यांनी भाष्य केले आहे.
सध्या देशभरामध्ये दहशतीचे आणि दडपशाहीचे वातावरण आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि भाषण स्वातंत्र्यावर घाला आहे, असे अनेक उदाहरणे आता समोर यायला लागली आहेत. आता ५० खोके घेऊन आले या गाण्यामध्ये कोणताही राजकीय संदर्भ नाही, या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सरकारला वाटले की आपण खोके घेतले आहेत. आपली बदनामी होईल, वास्तविक खोक्याचा जो संदर्भ आहे कुण्या व्यक्तीशी किंवा राजकीय पक्षाशी दाखवलेला नाही, तुम्ही खोके घेतले असतील म्हणून तुम्हाला वाटत असेल या गाण्यांमध्ये आपलेच नाव घेतले जात आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Ghar Banduk Biryani : ‘घर बंदूक बिरयानी’चा धिंगाणा, नागराजचा हलगीवर आकाश-सायलीने धरला ठेका
तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री या विषयावरुन सुरु असलेल्या विषयावर देखील भाष्य केले आहे. पंतप्रधानांना डिग्री मागितली तर 25 हजार रुपये दंड होतो, गाणे म्हणायला लागले तर त्याला अटक होते, या देशांमध्ये लोकशाही आहे की नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या रॅपरची बाजू घेतली आहे.