Download App

Raj Thackeray : बाळासाहेबांचा पुण्यातला ‘तो’ किस्सा, राज यांनी सगळ्यांना सांगितला

मुंबई : रोखठोक भूमिका मांडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पुण्यात एक विनोद केला होता. त्याबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी काही किस्से सांगितले आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावेळी घडलेला किस्साही सांगितला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, आमचे आजोबा गेले तेव्हा मी लहान होतो, 1974-75 ची गोष्ट आहे. पोर्तुगीज चर्चच्या परिसरात आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं, त्यावेळी वसंतदादा पाटील त्यांच्या अनावरणाला होते. त्यावेळी स्वतःच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, मी हा पुतळा आधी पाहायला हवा होता, कारण हा पुतळा माझ्या वडीलांपेक्षा मधु दंडवते यांच्या वडिलांपेक्षा चांगला दिसतोय. त्यांचा ह्युमर कुठे, कधी कसा जागा होतो काहीच सांगता येत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी राज ठाकरे यांनी दुसरा किस्सा पुण्यातला सांगितला, त्यात राज म्हणाले की, आम्ही पुण्याला होतो, पु.ल. देशपांडे यांचा वाद झाला होता, तेव्हा पुलंना भेटून बाहेर पडलो तेव्हा बाळासाहेबांना फोन केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मुंबईला ये मग आपण बोलू, मग त्यावर आठवड्याभरांनी आम्ही पुलंकडं गेलो आणि संध्याकाळी एका ठिकाणी जेवायला जायचं असं सांगितलं.

ज्या ठिकाणी गेलो तो माणूस एकदम बक-बक-बक करत होतो, त्यावेळी आम्ही दोघेच होतो, त्यावेळी त्यांना बाळासाहेब म्हणाले अरे काय बीयर वगैरे काही आहे का नाही, त्यावर ती व्यक्ती म्हणाली की अरे हो विसरलोच की, तेवढ्यात ते आतमध्ये गेले, ते आतमध्ये गेल्याबरोबर लगेच बाळासाहेब म्हणाले, चारपाच जणांना फोन कर हा पकवणार, त्यावर मी चारपाच जणांना फोन केला, मी भीमसेना आण्णांना फोन केला, रवी परांजपे असे दोन चार जणांना फोन केला, त्यावर सर्वांनी सांगितलं की मी अर्ध्या पाऊण तासात येतो, त्यानंतर मी मोठे उद्योगपती बी.जी. शिर्केंना फोन केला, ते म्हणाले मी पाच मिनीटात येतो. ते त्यांच्या मुलाबरोबर आले.

दोघेजण आल्यानंतर ते बसले त्यांचा काही विषय निघाला, त्यावर बी.जी. शिर्के म्हणाले की, बाळासाहेब तुम्ही रात्री इसाबगुल का नाही घेत? त्यावर बाळासाहेब म्हणाले का हो? त्यावर शिर्के म्हणाले, मी रोज रात्री पाच चमचे घेतो, बाळासाहेब म्हणाले पाच चमचे? ते म्हणाले हो मी गेली 25-30 वर्ष पाच चमचे घेतो. मग बाळासाहेब त्यावर म्हणाले की, मग सकाळी काय सिपोरेक्स का? बाळासाहेबांना आयत्या वेळेला ते कुठून येईल हे काहीच सांगता येत नव्हतं, असे अनेक प्रसंग आहेत, जे मला जाहीररित्या बोलता पण येणार नाहीत असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags

follow us