बारामती : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज (दि.7) पार पडत असून, यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. याठिकाणी सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे यांच्या थेट लढत होत आहे. यात नेमकी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेले असतानाच आता मतदानाच्या धामधुमीतकाटेवाडीमध्ये वेगळाच पॉलिटिकल ड्रामा समोर आला आहे. शरद पवारांची (Sharad Pawar) लेक आणि खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) या काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी भेटीसाठी म्हणून दाखल झाल्या आहेत. त्यांची ही भेट नेमकी कशासाठी आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नसून, सध्या काटेवाडीतील घरी केवळ अजितदादा आणि त्यांच्या आई आशाताई हे दोघेच असल्याचे सांगितले जात आहे. तर, सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या बुथवर जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. या सर्वामध्ये आता सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी दाखल झाल्यामुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. (Supria Sule In Ajit Pawar Residence In Katewadi)
राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान, उमेदवारांसह दिग्गजांनी बजावला मताधिकार, पाहा फोटो…
पवार कुटुंबियांना बजावला मतदानाचा
यावेळी पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहण्यास मिळत असून, सुनेत्रा पवारांनी विकासाच्या तर, शरद पवारांकडून भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत मतदन करण्याचे आवाहन मतदारांना केल्याचे प्रचारादरम्यान पाहण्यास मिळाले होते. आज बारामतीत मतदान पार पजत असून, सकाळी सकाळी पवार कुटुंबियांनी बारामतीतील विविध मतदार केंद्रांवर जात मतदानाचा हक्क बजावला होता. यात अजित पवार, सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मतदान केल्याचे दिसून आले. त्यानंतर मात्र अचानक सुप्रिया सुळे काटेवाडीतील अजितदादांच्या घरी दाखल झाल्यामुळे बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
‘मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजानं त्यांना बळीचा बकरा बनवलं’, राऊतांची खोचक टीका
दरम्यान, ही भेट नेमकी कशासाठी आहे याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, अजितदादांच्या मातोश्री आणि सुप्रिया सुळे यांच्याकाकी आशाताई यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे दादांच्या घरी अल्याचे सांगितले जात आहे. बारामतीत सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत असताना आणि राजकीय वातावरण तापलेले असताना अचानक सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या घरी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हे माझ्या काकीचं घर…
अजितदादांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, काटेवाडीतील घर हे माझ्या काका काकींचं आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अजितदादांची भेट झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता मी फक्त काकींटची भेट घेण्यासाठी आले होते असे स्पष्ट केले. यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींनादेखील उजाळा दिला.