Bharat Gogawale : दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. सुरूवातीला फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पहात होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात भरत गोगावलेंना (Bharat Gogawale)डावलण्यात आलं. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सहभागी झाला आणि त्यांना ९ मंत्रिपदं मिळाली. याही वेळी गोगावलेंची संधी हुकली. त्यामुळं गोगावलेंवर अन्याय झाल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, यावर आता गोगावलेंनी भाष्य केलं.
300 कोटींचा ड्रग्ज साठा उद्ध्वस्त, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचं मत झालं. भाजपच्या आमदारांचही हेच मत होतं. पण, पढच्या राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं आहे, असं भरत गोगावले म्हणाले.
गोगावले म्हणाले, मी रायगडाच्या पायथ्याशी राहणारा मावळा आहे. शिवरायांच्या विचारांनी चालणारा कार्यकर्ता आहे. आपल्याला ठाऊक आहे की, तानाजी मालुसरेंनी इतिहास घडवला. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं असं त्यांनी ठरवलं होतं. मुलाचं लग्न आठ दिवसांवर आलं होतं, तरीही त्यांनी आधी आपल्या राजाचा विचार केला आणि लढाईवर गेले. लाखो मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला जाणीव झाली की, एकनाथ शिंदे अडचणीत आले तर आमच्या आमदाराकीचा काय उपयोग? अशा काही घटना घडतात की, त्या अजरामर होतात. राजकारणात आमची नोंद होऊ शकते, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला का? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची काय गरज होती?असा प्रश्न विचारल्यावर गोगावले म्हणाले की, हे आमचे आणि भाजप आमदारांचे मत होते. पण, भविष्यातील राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं आहे. हे आम्ही समजून घेतलं आहे. अजून १४ मंत्रिपद आहेत. यासाठी देवीला साकडं घातलं आहे, असं गोगावले म्हणाले. त्यामुळं आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळतं का, हेच पाहणं महत्वाचं आहे.