300 कोटींचा ड्रग्ज साठा उद्ध्वस्त, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

300 कोटींचा ड्रग्ज साठा उद्ध्वस्त, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Drugs : नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काल रात्री 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

शिंदे गावात सुरु असलेला ड्रग्जचा कारखाना एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता. पोलिसांनी शेडचा पत्रा कापून ड्रग्जच्या कारखान्यात प्रवेश केला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्याचे साहित्य पोलिसांना आढळून आले होते. सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे.

युवकांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार मैदानात, पुणे ते नागपूर काढणार युवा संघर्ष यात्रा

दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे एमआयडीसी परिसरामध्ये मोठी कारवाई केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याच भागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहर ड्रग्जच्या विळख्यात तर सापडलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेल्या या ड्रग्ज प्रकरणाचा पोलिसांकडून देखील तपाप सुरु आहे. या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अमित शहांपर्यंत गेलेला भाजप-शिवसेनेतील वाद; कारण ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकांची अखेर बदली!

मुंबई पोलिसांकडून नाशिकमधल्या अंमली पदार्थाच्या कारखान्यात धाड मारत करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 12 जणांना अटक करण्यात आली. नाशिक रोडवरील शिंदे गाव एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. सुमारे 300 कोटींचे दीडशे किलोपेक्षा अधिक ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले असून मुंबईसह देशाच्या वेगवेगळ्या भागातून बारा जणांची धरपकड केली. या कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या झिशान इक्बाल शेख असे आरोपीचे नाव आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube