Download App

NCP : CM शिंंदेंचा राष्ट्रवादीला दणका; भिवंडीत 18 बंडखोर नगरसेवक अपात्र

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी करत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणाऱ्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर काल (26) जून रोजी हा निकाल जाहीर केला. यानुसार आता या नगरसेवकांना ३१ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा वर्ष निवडणूक लढता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Membership of 18 rebel corporators of Bhiwandi-Nizampur Municipal Corporation, who rebelled against Congress and joined NCP, has been cancelled)

2017 मध्ये भिवंडी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने एकहाती विजय मिळविला होता. 90 पैकी तब्बल 47 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. तर भाजपने 10, शिवसेना 12, कोणार्क विकास आघाडी 4, आरपीआय एकतावादी 4, समाजवादी पक्ष 2 आणि दोन अपक्ष सदस्य विजयी झाले होते.

Prithvi Shaw Controversy : मुंबई पोलिसांकडून पृथ्वी शॉला क्लिनचीट; सपनाचे सर्व आरोप खोटे

मात्र डिसेंबर 2019 मध्ये महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या 47 पैकी या 18 नगरसेवकांनी पक्षादेश डावलत भाजप पुरस्कृत कोणार्क विकास आघाडीला मतदान केलं होतं. त्यामुळे बहुमत असूनही अवघे 4 नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीचा महापौर विजयी झाला होता. या पक्षविरोधी भूमिकेमुळे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्र देऊन 18 जणांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली होती.

Diwali Holiday : भारतीयांसाठी आनंदाची बातमी! अमेरिकेतही मिळणार दिवाळीची सुट्टी

यादरम्यान, मध्यंतरीच्या काळात डिसेंबर 2020 मध्ये तत्कालिन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आव्हाड यांनी या नगरसेवकांचे पद वाचविण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली असल्याची चर्चा होती. यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी जवळपास 2 वर्षांनंतर दोन्ही बाजू ऐकून घेत या नगरसेवकांना दिलासा दिला होता. त्यानंतर जावेद दळवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे अपील केले होते. यावर शिंदे यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर काल रात्री याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. यानुसार या 18 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

Tags

follow us