Trupti Desai : भोंदू अशोक खरात आणि नीलम गोऱ्हेंच्या भेटीची माहिती देणारे शिवसेनेचेच कार्यकर्ते असल्याचा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai ) यांनी केला आहे. देसाई यांनी पत्रकार परिषद घेत भोंदू अशोक खरातबाबत मोठे खुलासे केले आहेत.
पुढे बोलताना देसाई म्हणाल्या, गोऱ्हे यांच्याबाबतीत जी माहिती दिली, जे त्यांच्यासोबत खरातच्या ऑफीसमध्ये उपस्थित होते, त्यातील एक व्यक्ती नाशिकची तर दुसरी व्यक्ती पुण्यातील आहे. माझ्याकडे ज्यांनी माहिती दिली, त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही एसआयटीच्या समोर किंवा त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर जात नाही, तोपर्यंत आमचं नाव सांगू नका. कारण त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांचं स्टेटमेंट बदलण्यासाठी त्रास दिला जाऊ शकतो. पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते पुरावे मी किंवा ते पुरावे स्वत:च समोर येतील, असं तृप्ती देसाईंनी सांगितलं.
मराठा अन् धनगर समाजाला तोडण्याचा प्रयत्न; अंजनगाव तणावावर मनोज जरांगेंना वेगळा संशय…
शिंदे गटातील अंतर्गत कुरबुरीमुळे तुमच्या खांद्याचा वापर झालाय का, असा सवाल देसाई यांना विचारण्यात आला.याप्रकरणात मी कुठेही अडचणीत येणार नाही, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. जे लोक आले, त्यांचं मी रेकॉर्डिंग करून घेतलं आहे, पण आत्ता पुरावे समोर आणण्यापेक्षा ते काय करतात ते बघू. जेव्हा आम्ही एसआयटीकडे किंवा त्यांच्या पक्षनेत्यांकडे जाऊ, ती लोकं तिथे येतील.
सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगारात 34 टक्क्यांनी वाढ होणार? आठव्या वेतन आयोगाची लगबग
आणि शिंदे सेनेच्या लोकांकडून माझा वापर कशाला होईल, त्यांच्याकडे अनेक प्रवक्ते, नेते आहेत. नील गोऱ्हे म्हणाल्या की ठाकरे सेनेच्या दुखावले गेलेल्या लोकांनी तृप्ती देसाईंना माहिती दिली असेल, पण हे मोठे लोकं आमच्याकडे कशाला येतील? त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना, प्रवक्त्यांना सांगितलं असंत ना, असा युक्तीवाद देसाईंनी केला. यामध्ये जी माहिती मिळाली ती खरी आहे आणि पुरावे योग्य वेळी, योग्य ठिकाणी सादर केले जातील, असंही देसाई म्हणाल्या.
विकास दिवटे आत्महत्या प्रकरण :
अशोक खरातचे कारनामे बाहेर आले. विरोधात कोण बोलत नाही. बोलले तर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. विकास रामदास दिवटे याने धमक्याना कंटाळून आत्महत्या केली. अशोक खरातचे धमक्याचे कॉल रेकॉर्ड विकास दिवटेने केले होते. राजेंद्र दिवटेने 11 जून ला गुन्हा दाखल केला आहे. 11 फेब्रुवारी 2022 ला त्यांचा भाऊ मृत्यू झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. यामध्ये कॅप्टन अशोक खरातला अटक झाली नाही कारण अशोक खरातचा सुवर्णकाळ होता. त्याच्याकडे अनेक आमदार मंत्री जात होते म्हणून त्याचे नाव वगळले असल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केलायं.
मुसळधार पावसाने पुणे जलमय; जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे भागात पाणी साचलं, वाहनचालक त्रस्त
रुपाली चाकणकरांनी चौकशीला सहकार्य केलं पाहिजे..
रुपाली चाकणकर शिवनिका ट्रस्टच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. रुपाली चाकणकर म्हणत असतील की, मला समन्स आले नाही आणि चुकीच्या बातम्या पसरत असतील तर ते चुकीचं पण बोलावलं जय आणि त्याला सहकार्य कराव आणि मी त्यांना सांगेल. समता नागरी पतसंस्थेमध्ये दररोज खाती उघडली जातात… अशोक खरातचे अनेक काळे पैसे पांढरे करायचे काम अनेकांनी केले. आता त्यात चाकणकरांचे पती बहीण कोणी असेल त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. माझ्याकडे हे प्रकरण 2025 ला बातमी दिली तेव्हा त्यांना महिला आयोगाचा दबाव आला तेव्हा त्यांनी मला पेनड्राईव्ह येईल असे सांगितले असल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलंय.
