हळदीवेळी शर्ट काढायला भोंदू खरातने दिला होता नकार, खरातच्या सासुरवाडीतून हादरवणारा खुलासा

Ashok Kharat अशोक खरातची सासुरवाडी आणि त्याची फरार असलेली पत्नी कल्पना खरात हीचं माहेर सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात आहे.

  • Written By: Published:
हळदीवेळी शर्ट काढायला भोंदू खरातने दिला होता नकार, खरातच्या सासुरवाडीतून हादरवणारा खुलासा

Ashok Kharat Wedding Kissa : स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे आणि आर्थिक लुटीचे एकामागून एक काळे कारनामे उघड होत असतानाच, आता त्याच्या सासुरवाडीतूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातची फरार पत्नी कल्पना हिचे माहेर असलेल्या सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात असून, लग्नाच्यावेळी अशोक खरात हळद लावताना अंगावरचे कपडे काढायला नकार दिल्याची माहिती ग्रामस्थांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Ashok Kharat : अचाट शक्तिवर्धक अन् कामोत्तेजक; तुर्कितील एल्विश मध कसा तयार होतो?

ग्रामस्थांनी काय सांगितलं?

अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या शांत गावात खरातच्या कृत्यांमुळे संतापाची लाट उसळली आहे. केवळ १५०० ते १७०० लोकसंख्या असलेल्या या गावात अशोक खरातचे सासर असून, त्याच्या अटकेनंतर आता त्याच्या पत्नीच्या माहेरच्या लोकांचीही ‘एसआयटी’ (SIT) कडून कसून चौकशी केली जात आहे. ३० वर्षांपूर्वीच्या लग्नापासूनच खरातचे वागणे कसे संशयास्पद होते, याचे अनेक पदर आता ग्रामस्थांनी उघड केले.

अंकशास्त्राचा गप्पा मारणारा कॅप्टन गणितातच ‘ढ’; दहावीच्या रिझल्टनं काढली अशोक खरातची कुंडली 

अशोक खरातचे लग्न १९९२-९३ च्या सुमारास पाडळी गावातील कल्पनाशी झाले. या लग्नाला सुरुवातीला घरून विरोध होता, कारण अशोकचे वय मुलीपेक्षा बरेच जास्त होते. एका ग्रामस्थाने त्यावेळचा थरार सांगताना म्हटले की, “लग्नाच्या विधीवेळी हळद लावताना अशोक खरातने अंगावरचे कपडे काढायला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, सर्वांनी आग्रह धरल्यानंतर जेव्हा त्याने कपडे काढले, तेव्हा त्याच्या अंगावर जखमांचे आणि वारांचे अनेक निशाण दिसून आले होते.अशोक खरातच्या लग्नाला एका भावाचाही विरोध होता. मात्र नंतर हे लग्न कसं जमलं ते कोणालाच माहीत नाही असेही एका ग्रामस्थाने बोलताना सांगतिले.

पत्नीचा माहेरशी १६ वर्षांपासून संपर्क नाही

अशोक खरातची पत्नी कल्पना ही सध्या फरार असून, एसआयटी (SIT) पथकाने तिच्या माहेरी जाऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. तपासात कल्पना गेल्या १६ वर्षांपासून माहेरच्यांशी संपर्कात नव्हती तसेच अशोक खरात तिला माहेरच्या लोकांशी साधे बोलूही देत नव्हता अशी माहिती नातेवाईकांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. कल्पनाचे माहेरचे लोक अत्यंत गरीब असून तुटपुंज्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करत असल्याचेही समोर आले आहे.

सिन्नर तालुक्यातील पाडळी गावाला केंद्रीय कृषिमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वारसा लाभला आहे. ज्या गावाचे नाव देशाच्या नकाशावर आदराने घेतले जात होते, त्या गावाचे नाव या भोंदूबाबा अशोक खरातने खराब केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्याच्याबद्दल आता बोलण्यासारखे काहीच उरलेले नाही, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

follow us