Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर (Parashuram Uparkar)आणि प्रवीण मर्गज (Praveen Margaj )अशी या मनसे पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. या मनसैनिकांची हकालपट्टी करण्याचं नेमकं कारण काय? हे मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. पण राज ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, महिन्याला 42 हजार रुपये पगार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यातच सिंधुदुर्ग (Sindhudurg)जिल्ह्यातील मनसेमधील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी कोकण दौरा केला.
त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर सरचिटणीस परशुराम उपरकर नाराज झाले होते. त्यावर आता मात्र मनसेनं अधिकृत पत्र काढून परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज यांचा मनसेशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे.
Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेशात ‘भाजप’ की ‘इंडिया’; सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर
मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढलं आहे. त्यात म्हटलंय की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर, प्रवीण मर्गज यांचा यापुढे मनसेसोबत कोणताही संबंध असणार नाही, संबंधितांनी याची नोंद घ्यावी असं कळवलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांचीदेखील हकालपट्टी केली होती. महेश जाधव यांचा मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर महेश जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
त्यावेळी मनसेच्या दोन्ही गटांमधील वाद थेट रस्त्यावर पाहायला मिळाला. त्यानंतर आता या दोन पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्षांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे.
मनसेच्या कार्यकारिणीतून त्यांच्या मर्जीतील काही जणांची हकालपट्टी केल्यानंतर परशुराम उपरकर हे नाराज होते. त्यातूनच मनसेतून उपरकर दूर होत गेले. आणि त्यानंतर आज तर त्यांचा मनसे पक्षाशी काहीही संबंध नसल्याचेच जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता आपण पुढच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपली पुढची पावलं टाकणार असल्याचं परशुराम उपरकर यांनी सांगितलं आहे.
परशुराम उपरकर कोण आहेत?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत कोकणातील एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतरही परशुराम उपरकर हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. कोकणात शिवसेना तळागाळात पोहचवण्याचं काम उपरकर यांनी केलं.
उपरकर यांची एकनिष्ठता पाहून शिवसेनाप्रमुखांनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली होती. परशुराम उपरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यांत चांगला जनसंपर्क आहे. पुढे मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांशी झालेल्या मतभेदामधून परशुराम उपरकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला, आणि आज परशुराम उपरकर यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता उपरकर हे पुन्हा शिवसेनेमध्ये जाणार का हे पाहावं लागणार आहे.