Download App

सुशीलकुमार शिंदेंना मोठा धक्का; धर्माण्णा सादुल यांचा कॉंग्रेसला गुडबाय

सोलापूर : तेलंगणाचे (Telangana)मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणात प्रवेश करत आपले हातपाय राज्यभरात घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केसीआरकडून देशभरातील अनेक नेतेमंडळींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच सोलापूरमधील (Solapur)कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार धर्माण्णा सादूल (Dharmanna sadul) यांना आपल्या गळाला लावण्यात केसीआर यांना यश आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सादूल यांनी कॉंग्रेस सोडून जाणे म्हणजे एकप्रकारे सोलापूरमधील कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंना (Sushilkumar shinde)मोठा धक्का मानला जात आहे. ते आज (दि.28) सकाळी 11 वाजता आपण आपला राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

धर्माण्णा म्हणाले की, मला केसीआर यांचा आग्रह आहे की, आपण आमच्या पक्षात येऊन काम करावं. तेलंगणातील माझ्या अनेक मित्रांचाही आग्रह आहे की, केसीआर यांच्यासोबत पक्षात यावं आणि काम करावं. आमच्या काही समस्या असतील तर त्याही आपल्या माध्यमातून सोडवून घेऊ शकू असं माझ्या मित्रांचं मत आहे. तसेच सोलापूरमधील तेलगू भाषिक लोकांचा आग्रह आहे की, आपण तेलंगणातील लोकमोर्चे आमच्य गावातील काही समस्या असतील तर त्या सोडवून घेऊ. त्याचबरोबर त्यांचाही आग्रह होता की, आपण बीआरएसबरोबर जाऊया, तर निर्णय घेतलेला आहे.

…म्हणून गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांकडं पाहायला वेळ नाही; जयंत पाटलांचा घणाघात

महाराष्ट्रामध्ये बीआरएस भवितव्याबद्दल धर्माण्णा म्हणाले की, मी अनेक लोकांशी बोललो आहे. त्यांची ज्यांनी भाषणं ऐकली त्याच्या प्रतिक्रीया चांगल्या आहेत. अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. प्रश्नाच्या मूळात हात घालून शेती, पाणी, आणि वीज याबाबत आम्हाला स्वयंपूर्ण केलं आहे असं तेलंगणाच्या लोकांचं मत आहे. त्यामुळे अशा व्यक्तीकडून देशाचंच भलं होईल, अशा प्रकारच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

आपण कॉंग्रेस सोडून जात असताना ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे किंवा इतर पक्षक्षेष्ठींपैकी कोणालाही याबद्दल बोललो नाही, फक्त माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. एकप्रकारे मरगळ आलेली आहे. ती दूर करण्यासाठी चाललो असल्याचे धर्मांण्णा म्हणाले. सोलापूरात 15-20 दिवसांमध्ये केसीआर यांच्या सभेमध्ये धर्माण्णा सादूल पक्षप्रवेश करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Tags

follow us