BJP Convention in Pune : लोकसभा निवडणुका झाल्या. यात एनडीएचं सरकार येऊन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. आता आपल्याला विधानसभेला सामोरे जायचे आहे. तिकडं रोज सकाळी नऊ वाजता उठतो.. म्हणतो आमचे नेते उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री आहेत. दुपारी बारा वाजता तुतारीचा आवाज येतो आणि सांगतो असं काही ठरलंच नाही. संध्याकाळी सहा वाजता काँग्रेसचा ढोल येतो आणि म्हणतो आम्ही जे ठरवू तसंच होईल असं त्यांचं राजकारण आहे. आता आपण विधानसभा निवडणूक जिंकण्याची खूनगाठ बांधा अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप दिला.
पुणे शहरातील बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचं अधिवेशनात दानवे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे उपमुिख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. या अधिवेशनात रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले म्हणून त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले.
मी कुठेही संधी शोधणार नाही, कुठेच जायची इच्छा नाही; रावसाहेब दानवे यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत !
दानवे पुढे म्हणाले, मोदींना पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा जनधन खाते सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा झाला आणि 50 कोटी लोकांचे झिरो बॅलन्स खाते उघडले गेले. सरकारची आर्थिक मदत थेट या खात्यात मिळाली. स्वच्छ भारत योजनेचा फायदा देशातील अकरा कोटी लोकांना झाला. कोरोना काळात 80 कोटी लोकांना मोफत धान्य या सरकारनं दिलं. देशातील लोकांनी गॅसवरील अनुदान सोडले. त्याचाही फायदा गरीब लोकांना झाला.
देशाचे पीएम कोण असा प्रश्न विरोधकांना विचारला. पण त्यांनी उत्तर काही दिलं नाही. कारण त्यांच्याकडे नेता नाही. नीती नाही. त्यांना अस्थिर सरकार आणायचं होतं. पण मतदारांनी पुन्हा सरकार आणलं. आता सगळे पक्ष एकत्र आले तरी त्यांना जिंकता आलं नाही हे तुम्ही लोकांना सांगा. आताचं सरकार मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आहे. आता विरोधकांच्या पोटात गोळा येऊन त्यांना चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीत विधानसभेचा ‘मास्टर प्लॅन’ ठरणार
एक वर्षभर जी 20 चे प्रतिनिधी देशात फिरले आणि नंतर त्यांनी देशाचं कौतुक केले. पण जग कौतुक करत असताना राहुल गांधी विदेशात देशाची बदनामी करत आहेत. आमच्या काळात कायदा सुव्यवस्था बिघडली का. खरी कायदा सुव्यवस्था आणीबाणीच्या काळात बिघडली होती. नेत्यांना विनाकारण जेलमध्ये डांबलं होतं. या निवडणुकीत चारशे पारचा मुद्दा उपस्थित केला. संविधान बदलण्याचा खोटा नरेटिव्ह पसरवला. या लोकांनी घटना बदलण्याचा प्रचार केला.