मी कुठेही संधी शोधणार नाही, कुठेच जायची इच्छा नाही; रावसाहेब दानवे यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत !
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रात मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा जालना लोकसभा (Jalna Loksabha) मतदारसंघात धक्कादायक पराभव झालेला आहे. ते सलग पाच टर्म खासदार राहिलेले आहेत. परंतु सहाव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या दानवे यांचा काँग्रेसचे कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी पराभव केला. पक्षासाठी कष्ट घेणाऱ्या रावसाहेब दानवे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागेल, अशी केवळ चर्चा झाली. पण आता राजकारणाबाबत रावसाहेब दानवे यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. मला राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद लढण्याची इच्छा नाही, असा सांगत एक प्रकारे राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेतच दानवे यांनी दिले आहे. (I will not seek opportunity anywhere, Raosaheb Danve’s political retirement signal)
सरकारकडे आजची रात्र, गांभीर्याने विचार करा, नाहीतर …, जरांगे पाटलांचा सरकारला शेवटचा इशारा
लेट्सअप मराठीशी बोलताना दानवे म्हणाले, लोकांनी मला आता थांबण्यास सांगितले आहे. मी कोणत्याही संधीची वाट पाहत नाही. लोक मला पुन्हा जा म्हणतील तेव्हा मी जाईल. मधल्या काळातील कुठे संधी शोधणार नाही. मी राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदही लढणार नाही. पक्ष संघटनेची जबाबदारी घेणार नाही. परंतु पक्षाचे काम करू, असे दानवे यांनी म्हटले आहे. याचा अर्थ दानवे हे सध्यातरी राजकारणात नसतील, असे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. एका अर्थाने ते राजकीय निवृत्ती घेतील, असे यावरून दिसून येत आहे.
“करू अजून कष्ट अन् जिंकून दाखवू महाराष्ट्र”; PM मोदींना CM शिंदेंचा विधानसभा विजयाचा शब्द
काँग्रेसचे नेतृत्व आमदारांना सांभाळू शकले नाही, दानवेंचा टोला
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटले आहेत. त्यातील काही आमदार अजित पवार व भाजपकडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यावर रावसाहेब दानवे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, भाजपकडे बहुमत होते. काँग्रेस आमदार द्विधा मनस्थितीत आहे. विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. आपल्याला काँग्रेसकडून उभा राहून निवडून येता येईल की नाही, याची शंका त्यांच्या मनात आहे. त्यामुळे आतून बाहेरून ते संपर्कात असतात. त्यामुळे त्यांची मते फुटली हे जगजाहीर आहे. कारण त्यांचे नेतृत्व त्यांना सांभाळू शकलेले नाही. त्यांना असुरक्षित वाटल्याने त्यांना जेथे सुरक्षीत वाटत असेल तेथे मतदान करण्याचे त्यांनी ठरविले आहे.