Download App

ठाकरे-राऊत हे वग नाट्यातले राजे अन् वजीर, ती मुलाखत म्हणजे करमणूक; पडळकरांचा टोला

Gopichand Padalkar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल बुधवारी आला त्यानंतर या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी ठाकरे-राऊत हे वग नाट्यातले राजे अन् वजीर असून ती मुलाखत म्हणजे करमणूक असल्याची टीका केली आहे. (BJP Gopichand Padalkar Criticize Udhav Thackrey and Sanjay Raut on Interview )

चाऱ्याच्या टंचाईची भीती; नगर जिल्हा प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्ण

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

यावेळी पडळकरांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना देवाने वाढदिवशी सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो. जे हिंदूत्व त्यांनी सोडलं त्यावर त्यांनी परत यावं. तसेच त्यांची मुलाखत मी पाहिली नाही. मात्र ज्याप्रमाणे जत्रेत तमाशाचा कार्यक्रम असतो. त्यात वगनाट्य असतं. त्यात एक राजा आणि एक वजीर असतो. त्यांचं रात्रीच हे वगनाट्य होतं. पण सकाळी परिस्थिती वोगळी असते. त्याप्रमाणे हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी संजय राऊत वगातले राजे आणि वजीर आहेत. अशी टीका पडळकरांनी केली.

अहमदनगर भाजपच्या ‘या’ पदाधिकाऱ्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल…जाणून घ्या प्रकरण

पुढे ते असं ही म्हणाले की, ठाकरे म्हणाले की, भाजपला सत्तेची मस्ती आहे. पण भाजप जेव्हा अडीच वर्ष सत्तेत नव्हता तेव्हाही लोकांसाठी काम करत होता. विरोधी पक्षात असूनही आमचा एक आमदार तर नाही पण एक नगरसेवकही फुटला नाही. तसेच आम्ही निवडणुका घ्यायला ठाकरेंना घाबरतो असं नाही तो निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ठाकरेंना महायुती घाबरते असं अजिबात नाही. असं यावेळी पडळकर म्हणाले.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली, असा जळजळीत सवाल केला.

Tags

follow us