अहमदनगर भाजपच्या ‘या’ पदाधिकाऱ्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल…जाणून घ्या प्रकरण
Ahmednagar News : भाजपचे नगरचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोढा यांनी साताऱ्यातील लोणंद येथील एका खाजगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंना चुना लावला असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणी सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून बुधवारी रात्री उशिरा पर्यंत ही कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याची देखील माहिती समोर आली आहे, तत्पूर्वी सातारा पोलिसांच्या लोणंद पोलिसांच्या पथकाने लोढा यांच्या निवासस्थानी चौकशी केल्याचे समजते. दरम्यान या घटनेमुळे नगर शहरात तसेच राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Ahmednagar News filed case on BJP activist in Satara)
Raj-Udhav Thackrey एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, मी, आला तर…
नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कपाशी येथील शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या कंपनीत वेळोवेळी इंजिनिअरींगची अनेक प्रकारची कामे केली जातात. सन 2021 मध्ये आमच्या इंडस्ट्रीजमध्ये काही इंजिनीअरींगची कामे करणे आवश्यक असल्याने आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांकडुन त्याबाबत कोटेशन मागवली होती. यामध्ये फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अॅक्युरेट इंजिनिअरींग अण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांनी त्यांचे कोटेशन आमच्या कंपनीत दिले होते. या कोटेशनबरोबरच त्यांनी आपण यापूर्वीही विविध प्रकारची कामे केली असून मोठा अनुभव असल्याचे आम्हाला सांगितले. व आमचा विश्वास संपादन केला.
‘अजित पवार यांचं ‘ते’ वक्तव्य अत्यंत वाईट’; उद्धव ठाकरेंनी अजितदादांना पहिल्यांदाच सुनावलं
सदर इसमांवर आम्ही विश्वास ठेवुन आमच्या इंडस्ट्रिजचे काम वसंत लोढा व प्रसाद आण्णा यांना दिले. वरील दोन्ही कंपनीने आम्हाला वेळोवेळी बिले सादर केली त्याप्रमाणे आम्ही बिलाच्या रकमा अदा केल्या. मात्र पैसे अदा करूनही फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अँक्युरेट इंजिनिअरींग अॅण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांनी कंपनीचे वर्क ऑर्डरप्रमाणे काम केले नाही व कामास टाळाटाळ करु लागले. त्यानंतर आम्ही दोघांनी आम्हाला सादर केलेली कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे समोर आले. ऑर्डर मिळावी यासाठी त्यांनी फसवणूक केल्याचे उघड झाले.
या फसवणूक प्रकरणात केलेल्या कामांची तपासणी केली असता कंपनीत बाहेरुन नवीन साहित्य आलेले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसेच गेटवरील इनवर्ड आऊटवर्ड वहीतील नोंदीवरुन दिसून येत आहे. कंपनीमधील संतोष पोपटराव होले (सिनिअर इंजिनीअर), महादेव अनंत भंडारे (चिफ इंजिनिअर), संजय अनिरुद्ध मुळे (सिनिअर इंजिनिअर) यांना पैशाचे आमिष देऊन कंपनीमधील मशिनरी व साहित्य, पॅनल बॉक्स, पाईप हे सर्व नवीन टाकले आहे. तसेच नवीन काम केले, असे भासवून वसंत लोढा आणि प्रसाद आण्णा यांनी फसवणूक केल्याची तक्रार आहे.
वरील दोघांच्या कंपन्यांनी आमची फसवणूक केली असून आपली रक्कम त्यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी ती कंपनीत जमा केलेली नाही. त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. लोणंद, सातारा पोलिसांनी अहमदनगर शहरात येऊन कोतवाली पोलिसांच्या मदतीने अहमदनगर मधील वसंत लोढा यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.