BJP Keshav Upadhye Criticizeto Aditya Thackeray and Jitendra Awhad on Ban On Sale Of Meat : 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महानगरपालिकेकडून देण्यात आल्याने राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयाचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोध करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर आता या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे आणि आव्हाडांना सवाल केला आहे.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
काय खाव काय खाऊ नये, याचा निर्णय सरकारने करूच नये. या बद्दल दुमत नाहीच फक्त विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशातील विविध समाजांच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे अशी भाजपाची भूमिका आहे.
काँस्टिट्यूशन क्लब निवडणुकीत भाजपाचा दबदबा; खासदार राजीव प्रताप रूडी विजयी
15 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्यावरून महायुती सरकारवर आगपाखड करणारे आदित्य ठाकरे व जितेंद्र आव्हाड हे 15 ॲागस्ट कत्तलखाना बंदी साठी शरद पवारांचा निषेध करणार का? विरोध करणार का? त्यांना जाब विचारणार का? हा खरा प्रश्न आहे.
कारण १५ ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारने घेतलेला नसून 12 मे 1988 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना व कॅाग्रेस सत्तेत असताना घेतलेला निर्णय आहे. त्यानंतर महिनाभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून हा 15 ॲागस्टचा कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला.
काय खाव काय खाऊ नये, याचा निर्णय सरकारने करूच नये या बद्दल दुमत नाहीच फक्त विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशातील विविध समाजांच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे अशी भाजपाची भूमिका आहे.
१५ ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्यावरून महायुती सरकारवर आगपाखड करणारे आदित्य ठाकरे व… pic.twitter.com/4F2mRDcStP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 13, 2025
एवढंच काय मविआ सरकारमध्ये 2/3 वर्षांपूर्वी हे दोघेही मंत्री असतानासुध्दा 15 ॲागस्ट ला कत्तलखाने बंद ठेवण्यात आले होते, तेव्हा त्या विरोधात एक शब्दही हे दोघेही बोलले नाहीत.
16 कोटींचा अलिशान सी फेसिंग व्ह्यू फ्लॅट वापराविना, पण मुंडेंना सोडवेना शासकीय निवासस्थान
पण जितेंद्र आव्हाड व आदित्य ठाकरे यांना विस्मरणाचा आजार जडला असे म्हणणार नाही. कारण पक्ष व सत्ता गेल्याने सारासार विवेक गमावून नैराश्यात असलेल्या आव्हाड व ठाकरेंकडून अर्थात सरकारच्या प्रत्येक कृती विरोधात बोलण्याव्यतिरक्त वेगळी अपेक्षाच जनता करीत नाही. महायुती सरकारने सूर्य पूर्वेला उगवतो असे म्हटले तरी हे लोक त्याला विरोध करतील.
सावधान! राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा धुमाकूळ; 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
प्रशासनावर उत्तम पकड असणाऱ्या तसेच महायुतीत उपमुख्यमंत्री असणाऱ्या व आता 15 ॲागस्टच्या मांसबंदीच्या निर्णयाला विरोध नोंदविणाऱ्या अजित पवार यांनाही हा निर्णय महायुती सरकारमध्ये झालाच नाही याची माहिती असणारच याबद्दल शंका नाही.