karnatak Election Result 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. यामध्ये कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर भाजपचे नेते आशिष शेलारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातल्या निकालात आम्हाला जे दिसत आहे, ते आम्हाला अपेक्षित असलेले निकाल नाहीत. कर्नाटकाच्या ट्रेंड नुसार आम्हाला या ठिकाणी निकाल येताना दिसत नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच काँग्रेसच्या बाजूने या ठिकाणी झुकाव दिसत आहे. त्यामुळे भाजपा याबद्दल विश्लेषण आणि विच्छेदन विचार आणि संवाद करून यातील निर्णय करेल, असे ते म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवरदेखील निशाणा साधला आहे. कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकल्यामुळे यांच्या मनात इकडे उकळ्या फुटायला लागल्या आहेत. दुसऱ्यांच्या घरात काही झालं तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पेढे वाटायचं काम करत असतात, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.
Karnataka Election : देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरली; राष्ट्रवादीचं पार्सल…
तसेच दुर्दैव आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने जो निर्णय घेत आहे तो अनाकलनीय आहे. पण जिकडे तिकडे संजय राऊत जातात त्या ठिकाणी पराभव निश्चित आहे. संजय राऊत ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीला झटका खायला लागलेला आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांना लक्ष केले आहे.
आर अशोक यांचा पराभव करून DK Shivakumar सुमारे एक लाख मतांनी विजयी
दरम्यान, यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील निशाणा साधला आहे. बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना असे काही दिवाने मला पहायला मिळत आहे. त्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये काही यशही नाही आहे. त्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये जागा देखील नाही आहे. त्यांचा कुठे वजूदही नाही आहे. असेही लोकं आपल्याला आज पहायला मिळत आहे. हे लोकं जन्मभर दुसऱ्याचा घरी पोरगा झाला म्हणूनच आनंद साजरा करतात, त्यामुळे यावर बोलण्यासारखं काही नाही, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे गट व राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.