महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा; अमित शाहांची तोफ धडाडली

महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित […]

WhatsApp Image 2024 03 05 At 5.22.00 PM

WhatsApp Image 2024 03 05 At 5.22.00 PM

महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीतील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. (Minister Amit Shah Critisize Sharad Pawar & Udhav Thackeray)

Sanjay Raut : गडकरी दिल्लीत नको म्हणून आताच त्यांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र; राऊतांचा भाजपवर घणाघात

अमित शाह म्हणाले, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत. घराणेशाही मानणारे पक्ष लोकशाहीला पूरक नाहीत. इंडिया आघाडी फक्त मुलामुलींना सत्तेत बसवण्यासाठीच एकत्र आली असून सोनिया गांधींना राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायंच आहे, तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं असून ममता बॅनर्जी यांना पुतण्याला तर स्टॅलिन यांना मुलाला मुख्यमंत्री बनवायंच असल्याची सडकून टीका अमित शाह यांनी केली आहे.

Prerna Arora: निर्माती प्रेरणा अरोरा ‘डंक’ सिनेमाबद्दल म्हणाली, ‘भू-माफिया आणि…’

यावेळी बोलताना अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऋणांतून देश कधीच मुक्क होऊ शकत नसून भाजपला मत म्हणजे युवकांच्या उज्वल भविष्याला मत, भाजपला मत म्हणजे मोदींना पतंप्रधान करण्यासाठीच, युवकांनो तुमचं मत त्याचं पक्षाला द्या जो पक्ष भारत भूमीला जगाच्या सर्वोच्च ठिकाणी बसवेल, असं आवाहन अमित शाह यांनी युवकांना केलं आहे.

Exit mobile version