Download App

सापळ्यामध्ये कधी चुकून माणूस अडकतो ; तावडेंवरील आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

  • Written By: Last Updated:

BJP Leader Chandrakant Patil Reaction On Vinod Tawde : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. दरम्यान भाजप (BJP) नेते विनोद तावडे यांनी 15 कोटी वाटले, असा आरोप केला जातोय. यावर आता भाजप नेते महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, 1977 पासून आम्ही एकमेकांना ओळखतो. त्या कुटुंबाने एक रुपयाचा भ्रष्टाचार कधी केला नाही. 10 वर्ष त्यांनी पूर्ण वेळ विद्यार्थी परिषद केली. कोणाही सामान्यांचा विश्वास यावर बसणार नाही. मी खंत व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सामाजिक परिवर्तन करायचे हे संस्कार घेऊन पुढे चाललो आहे. 51 पासून निवडणुका सुरुवात झाल्या. निवडणुकीची परंपरा कधीच खंडित झाली (Vinod Tawde Allegations) नाही, सुरळीतपणे सुरू असलेली ही लोकशाही आहे.मी सगळ्यांना आग्रह करतोय की, मतदान करा. 2019 मध्ये आयत्या वेळी मला सांगितलं गेलं होतं, पण यावेळी मला तयारी करायला वेळ मिळाली. स्थानिक आमदाराला डावलून दिलं याचा रोष होता, बाहेरून आलो आहे याचा रोष असल्याचं ते म्हणाले आहेत.

देवाला प्रसाद चालतो,’विनोद’ नाही; तावडे प्रकरणानंतर मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत

पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणूक आयोग चौकशी करेल. राज्याच्या परंपरेला काळिमा फासणारे राजकारण चालू आहे. नामोहरम करताना समोरच्याला आयुष्यातून उठवतोय. अनवधानाने सापळ्यामध्ये कधी चुकून माणूस अडकला जातो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 74 हजारचं लीड आम्ही कोथरूडमधून क्रॉस करणार, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय.

निवडणुकीत बिटकॉईनचा गैरवापर केल्याचा आरोप; सुप्रिया सुळेंचा संताप, मानहानीचा खटला दाखल करणार

मतदान करणे, हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आज सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या कोथरुडमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर आरुढ ठेवण्यासाठी तसेच आपली भारतीय लोकशाही समृध्द करण्यासाठी अवश्य मतदान करा, असे आवाहन मी करतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

 

follow us