Chandrasekhar Bawankule On Nana Patole : राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. ते कोळणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shide) परदेश दौरा रद्द केल्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केला होता. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवरही टीका केली होती. भाजपमध्ये (BJP) मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यामुळं लवकरच पक्षात स्फोट होईल, असं विधान त्यांनी केलं. दरम्यान, यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) पलटवार केला.
भाजपमध्ये लवकरच स्फोट होणार असल्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्याविषयी बावनकुळेंना विचारलं असता ते म्हणाले की, नाना पटोले यांना भाजप समजली नाही त्यामुळं भाजप सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप हा व्यक्तीसाठी आणि परिवारासाठी काम करत नाही. त्यामुळं कधीच पक्षात स्फोट होऊ शकत नाही. उलट काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पाय खेचण्याचे प्रकार सुरू असल्याने त्यांच्या पक्षात स्फोट होण्याची दाट शक्यता आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. ते नागपुरात बोलत होते
भाजपशासित MP मध्ये संतापजनक घटना; रक्ताने माखलेली ‘ती’ अर्धनग्न अवस्थेत भटकत होती पण..,
यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासावरही आक्षेप घेतला. काँग्रेसच्या काळात भारतात आतांकवादी घुसत होते, कसाबकडून काँग्रेसच्या काळात दहशतवादाची पेरणी झाली. पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याची ताकद भाजपने दाखवली. या विषयावर नाना पटोले यांच्याशी चर्चा करायला कुठल्या चौकात तयार आहे. काँग्रेसने 65 वर्षात कसा दहशतवाद पसरवला हेही सांगतो, असेही बावनकुळे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात बावनकुळेंना विचारलं असता ते म्हणाले की, प्रत्येक समाजाला आरक्षण हवे आहे आणि त्यासाठी उपोषण करण्याचा अधिकार आहे. त्यांनी केलेली मागणी हा समाजाचा हक्क आहे. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. भाजपच्या राजवटीत सर्व समाजाला आजवर न्याय मिळाला आहे आणि भविष्यातही मिळेल, असं बावनकुळे म्हणाले.