राऊतांचा साबण काँग्रेसचा तर पावडर राष्ट्रवादीची अन् टिळा…; बावनकुळेंची राऊतांवर बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा काल सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यावरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट व भाजप हे आमनेसामने आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कोर्टाच्या निकालानंतर भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T123218.003

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 12T123218.003

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा काल सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यावरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट व भाजप हे आमनेसामने आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कोर्टाच्या निकालानंतर भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बावनकुळेंनी तशाच शब्दात राऊतांना उत्तर दिले आहे.

न्यायालयाने बहुमतचाचणीपासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर ठरवलेला आहे. तरीही हे नागडे का नाचत आहे व पेढे कुणाला भरवत आहे, असे टोला त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड ही बेकायदेशीर ठरवली आहे. देवेंद्र फडणवीस हे वकील आहे. त्यांनी नागपूरमध्ये प्रॅक्टीस केली असल्याचे ते सांगत असतात. त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तक चाळायला पाहिजे. पुन्हा एकदा रिव्हीजन करायला पाहिजे. कधी-कधी रिव्हीजन करण्याची वेळ येते, असे टीका राऊतांनी केली होती.

शिंदे-फडणवीस सरकार फक्त तीन महिने, जावं तर लागणारच; राऊतांचा घणाघात

यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील जोरकसपणे उत्तर दिले आहे. संजय राऊत अंघोळीचा साबण काँग्रेसचा वापरतात. पावडर राष्ट्रवादीची लावतात. कपाळावर टीका पवारांचा लावतात आणि शिवसेनेला स्वच्छ धुवून काढतात, अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी राऊतांना सुनावले आहे. तसेच यावेळी त्यांनी राऊतांना सामनावरुन देखील डिवचले आहे.

Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…

आपल्या घरी आपण प्रिटींग प्रेसमध्ये पॉम्प्लेट छापतो तसे ते आपल्या घरी सामना नावाचे पॉम्प्लेट छापतात आणि दिवसभर काम नाही म्हणून कुठल्यातरी व्यक्तीकडून लिहून घेतात व वाचतात अशा शब्दात बावनकुळेंनी राऊतांना सुनावले आहे.

Exit mobile version