Chitra Wagh On Supriya Sule : काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar group)खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्यात चांगलेच खटके उडताना दिसत आहेत. कोणत्या न् कोणत्या कारणाने सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ यांची राजकीय टोलेबाजी सुरुच असते. त्यातच आता चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करुन सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई…@supriya_sule
कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू …?
राज्यातील आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी १०० कोटींची वांगी नाही ना पिकवू शकत 🍆🍆ताई…
नविन जन्माला येणाऱ्या मुलीला १लाख १ हजार रूपये मिळणार आहेत तर तुमच्या का पोटात… pic.twitter.com/k3bBYa1Q3c
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 11, 2023
त्या व्हिडीओमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, ओ ऽऽऽऽ राज्याच्या मोठ्ठया ताई…चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्यच झालंय का? ताई एक लक्षात घ्या, राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी 100 कोटी रुपयांची वांगी पिकवू शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येणारी मुलगी जर लखपती होणार असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? असा सवालही यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
एकनाथ शिदेंचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केलं जाणार होतं; संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप
तसेच कुणी जर लखपती होणार असेल तर तुमच्या करोडपती असण्यावर कुणी आघात करत नाही, राहिला प्रश्न भाजपमध्ये महिलांना मान-सन्मान मिळण्याचा, तर कुठल्याही अन्य राजकीय पक्षापेक्षा भाजपमध्ये महिलांना मान-सन्मान अधिक दिला जातो, हे मी तुम्हाला सांगते, असे चित्रा वाघ यांनी ठणकावून सांगितले.
Supriya Sule : ‘फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढते…’
वाघ म्हणाल्या की, बरं आज तुमच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी गोंधळ घातला म्हणे, एवढंच नाही तर तुमच्याच पक्षातल्या महिलांनी त्यांना तिथं डावललं जात असल्याची खंत व्यक्त केली. त्याचं चिंतन आणि मनन करा की, का बरं असं झालं असेल? त्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी तऱ्हा आहे ना ही आता जुनी झाली आहे.
त्यामुळे मोठ्या ताई आपण चिंतन मनन करा… यह पब्लिक है और यह सब जानती है! त्यामुळे भाजपवर बोलायचं सोडून द्या आणि आपल्या पक्षावर लक्ष द्या… हा माझ्याकडून सल्ला आहे तुम्हाला… राज्याच्या मोठ्या ताईंना धन्यवाद असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी नुकताच माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी फुटीवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली. 105 आमदार निवडून आणलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देत भाजपनं अन्याय केला, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. तुम्ही तुमची आणि तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा. आमची काळजी करू नका, असं म्हणत चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली.