तू आव्हाड नाहीच, तू हाड हाड आहेस…थोबाड बंद ठेव; चित्रा वाघांचा हल्लाबोल

Jitendra Ahwad Vs Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून एकमेंकावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. फेसबूक, ट्वीटरवर एकमेंकाविरोधात व्हिडिओ टाकून डिवचले जात आहे. आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जितेंद्र आव्हाड यांना ‘तू आव्हाड नाहीच, तू हाड हाड आहेस, […]

Ahwad

Ahwad

Jitendra Ahwad Vs Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून एकमेंकावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. फेसबूक, ट्वीटरवर एकमेंकाविरोधात व्हिडिओ टाकून डिवचले जात आहे. आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जितेंद्र आव्हाड यांना ‘तू आव्हाड नाहीच, तू हाड हाड आहेस, तुझा मेंदू सडल्याचे सिध्द केले आहे, अशा खालच्या शब्दात हल्लाबोल केला आहे. (bjp-leader-chitra-wagh-speak-on-jitendra-ahwad)

माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळीवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करणारे ट्वीट केले आहे. लाज नाही वाटली आव्हाड. तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसते तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचे शस्त्र असते. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेले आहे. तुमच्यासारख्या लांडग्यांना भीक घालत नाही. तुमच्यासारखे लांडगे खूप आहेत. त्यांना चालविणारे खूप आहे. बहिण म्हणून चारित्र्यहनन करणारी तुमच्यासारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.

दंंगलींमुळे कुणाचा फायदा हे तर जगजाहीर; जयंत पाटलांचा निशाणा नेमका कुणावर?

माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे, किती वेळा पाय धरलेत हे आठवा. तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्या होती की हत्या केली. त्याची चौकशी व्हायला हवी. तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेले नाही. पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचे नाही. तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Kolhapur : सांगलीनंतर कोल्हापुरात दरोडा; अंधाधुंद गोळीबार करत लुटले दोन कोटींंचे दागिने

मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा गिधाड आहेस तू. तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार आहे. आव्हाड नाहीच, तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझे थोबाड बंद ठेव. माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे.

चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांचा डीएनए तपासावा लागेल, असे म्हटले होते. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्ही माझ्या आई-वडिलांची बदनामी केली आहे. माझ्या आईच्या चारित्र्यावर हल्ला केला आहे. मी पुन्हा निक्षून सांगतो, माझ्या आईची बदनामी आपण केलीत, तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा आव्हाडांनी दिला आहे. मांजरीला वाटते, मी डोळे मिटून दूध पिते आहे. पण सगळ्यांनी बघितलेले असते. पण लोक लाजे काजे बोलत नाहीत, असा निशाणा वाघ यांच्यावर आव्हाड यांनी साधला आहे. त्यालाच चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.

Exit mobile version