Download App

मंत्री गावितांच्या विधानाचं भाजप नेत्याने केलं समर्थन! म्हणाल्या, चुकीचा अर्थ काढून…,

Chitra Wagh : मंत्री विजयकुमार गावित अजब दाव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. विरोधकांकडून गावित यांना ट्रोल केलं जात असतानाच आता भाजप नेत्याकडून त्यांच्या विधानाचं समर्थन करण्यात आलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गावितांच्या विधानाचं समर्थन करीत म्हणाल्या, मासे खाल्ल्याने डोळे, आरोग्य चांगलं राहते, मग जोडीदार चांगला मिळेल, असं त्यांना म्हणायचे होतं, पण विधानाआधीचा आणि नंतरचा संदर्भ न घेता काहींनी चुकीचा अर्थ काढून व्हिडिओ शेअर केला, असल्याचं वाघ म्हणाल्या आहेत.

शरद पवारांबद्दलचे ‘ते’ मत खरेच! वळसे पाटलांच्या दाव्याला अजितदादांचा पूर्ण पाठिंबा

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकणी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. त्वचाही चांगली दिसू लागते. माशात एक प्रकारचं तेल असतं. माशाच्या तेलाचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली होते, असं गावित यांनी नमूद केलं आहे, पण त्यांच्या विधानाआधीचा आणि नंतरचा संदर्भ न घेता काहींनी चुकीचा अर्थ काढून व्हिडिओ शेअर केला, असल्याचं वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.

आंबेगाव त्यांना नक्कीच धडा शिकवेल, हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला; वळसे पाटलांवर आव्हाडांची टीका

अभिनेत्री ऐश्वर्या राय बंगळुरूला समुद्रकिनारी राहतात. रोज मासे खातात म्हणून त्यांचे डोळे आणि स्किन चांगली आहे. असं त्यांनी सांगितलं त्यावेळी तिथे अनेक तरुण-तरुणी होते. चांगले मासे खाल्ले तर डोळ्यांचे आरोग्य चांगले होईल, त्वचेचे आरोग्य सुधारेल, डोळे, त्वचा आणि तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला जोडीदार चांगला मिळेले, असं डॉ. गावित यांना म्हणायचं होत.

दरम्यान, गावितांच्या विधानाचा मागचा पुढचा संदर्भ न लावता मधली ओळ दाखवली जाते. पण कोणत्याही मोठ्या व्यक्तीने बोलताना विशेषत: लोकप्रतिनिधींनी महिलांविषयी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असंही त्यांनी बजावून सांगितलं आहे. तसेच महिलांच्या बाबतीत कोणतही वक्तव्य करताना ती तोलून मापूनच बोलली पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Tags

follow us