आंबेगाव त्यांना नक्कीच धडा शिकवेल, हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला; वळसे पाटलांवर आव्हाडांची टीका

आंबेगाव त्यांना नक्कीच धडा शिकवेल, हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला; वळसे पाटलांवर आव्हाडांची टीका

Jitendra Awhad on Dilip Walse-Patil : अजित पवारांसह (Ajit Pawar) काही आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आता पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार हे कधीच स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मोठे नेते असूनही त्यांचे केवळ 60 ते 70 आमदार निवडून येतात, अशी टिका त्यांनी केली. त्यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी प्रत्युत्तर दिलं. पवारांचा विश्वासू साथादीरच अत्यंत कृतघ्न निघाला, अशी टीका आव्हाडांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी दिलीप वळसे पाटलांवर जोरदार टीका केली. आव्हाडांनी लिहिलं की, वळसे-पाटील यांची नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. शरद पवारांचा अत्यंत विश्वासू सहकारी आणि शरद पवारांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस प्रत्यक्षात अत्यंत कृतघ्न निघाला. शरद पवारांच्या नजरेनं या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याचं आश्चर्य वाटतं. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांसी नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजुच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही.

वळसे-पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. पण शरद पवारांसाठी मात्र खूप वाईट वाटलं. अनेकांना सर्व काही देऊनही शरद पवार मात्र कायमच रीते राहिले. बरं झालं शरद पवारांविषयी यांच्या मनातील विष बाहेर पडत आहे. हे सर्व महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव त्यांना नक्कीच धडा शिकवेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

वळसे-पाटील काय म्हणाले?
वळसे-पाटलांना शरद पवारांची उंची काढत त्यांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उभं केलं. ते म्हणाले, शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असे आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो, पण, पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. मात्र, शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना एकहाती सत्ता आणता आली नाही, असा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube