पवारांची बंदूक ठाकरेंवर निशाणा; बालगंधर्वमध्ये ‘लोक माझे सांगाती’ वरून फडणविसांची तुफान फायरिंग

Devendra Fadanvis Attack On Sharad Pawar and Udhdhav Thackeray :  भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता राज्याचे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 18T165008.783

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 18T165008.783

Devendra Fadanvis Attack On Sharad Pawar and Udhdhav Thackeray :  भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीला संबोधित करताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

पुण्यातल्या सभेतून फडणवीसांचा एल्गार; म्हणाले, ‘न उनकी हार नई है, न अपनी जीत नई

यावेळी त्यांनी शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा आधार घेत उद्धव ठाकरेेंना सुनावले आहे. आत्ता एक पुस्तक आलं आहे. त्याचे नाव आहे. लोक माझे सांगाती. त्यातील पान क्रमांना 318 व 319 यातील 10 वाक्य मी तुम्हाला सांगतोय. यातील पहिलं, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंसोबत नव्हती. दुसरं, उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तम माहिती नसे जी मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती. तिसरं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाचा आम्हाला आली नव्हती. चार, त्यांचे कुठे काय घडतंय याकडे बारीक लक्ष नसे, उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायली हवी होती ती नव्हती. त्यानुसार काय पाऊले उचलायची हे ठरवण्याचे राजकीय चातुर्य असायला हवं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती, असा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Pune BJP State Executive Meeting : कसलीही अपेक्षा करू नका; मंत्रिपद मागणाऱ्यांना फडणवीसांनी दिला थेट इशारा

हे वाक्य मी म्हटलेलं नाही. हे ज्यावेळेला आम्ही बोलत होतो तेव्हा हे आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवत होते. शरद पवारांनी हे लिहिल्याने मी त्यांचे आभार मानतो. आपल्याला काही करण्याची आवशक्यता नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे या दोघांनाही टोला लगावला आहे. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षा कडे देतो. माझा पक्ष ठराव करेल, माझं राजीनामा माझ्याकडे परत येईल. शरद पवार यांनी राजीनामा देतो म्हणन आणि देणं यातला फरक पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनाम्यातील  फरक समजून सांगितला, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे.

Exit mobile version