पुण्यातल्या सभेतून फडणवीसांचा एल्गार; म्हणाले, ‘न उनकी हार नई है, न अपनी जीत नई
Devendra Fadanvis On Udhdhav Thackeray : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीला संबोधित करताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
मंदिर प्रशासनाचा अजब निर्णय, तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांना ड्रेसकोड
यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणूक निकालावरुन उद्ध ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरुन देखील ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राजाचा आवडता पोपट मेला हे कोणी सांगायला तयार होत नाही. तसेच उद्धव ठाकरेंना पोपट मेला हे कोणी सांगायला तयार होत नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाने जी याचिका केली होती. त्यामध्ये एकुण 8 मागण्या होत्या. 8 पैकी त्यांची एकही मागणी मान्य केली नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना सुनावले आहे.
सिद्धरामय्या मुख्यमंत्री : शिवकुमारांचं खच्चीकरण की काँग्रेसची राजकीय खेळी?
काहींना वाटत आहे की कर्नाटक पॅटर्न महारााष्ट्रात चालेल. पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मतांचे ध्रुवीकरण करुन महाराष्ट्रात तुमची सत्ता येणार नाही. यावेळी त्यांनी एक शेर म्हणत विरोधकांना सुनावले आहे. ‘फिर चिखते, फिर रहे बधहवास चेहरे, फिर रचे जाने लगे है षडयंत्र गहरे, या सगळ्या षडयंत्राला आमचे उत्तर आहे, ना उनकी रस्म नई है, न अपनी रीत नई है, युही हमेशा खिलाए है हमने आग मे फूल, न उनकी हार नई है, न अपनी जीत नई, त्यामुळे आपण जिंकणार असे ते म्हणाले आहेत.