Download App

खडसेंना सगळी पदं घरातच पाहिजेत; रावेर लोकसभेच्या दाव्यावरून गिरीश महाजनांचा टोला

  • Written By: Last Updated:

Girish Mahajan on Eknath Khadse : रावेर लोकसभेची (Raver Lok Sabha) जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाल्यास इंडिया (INDIA) आघाडीच्या माध्यमातून आपण रावेर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं होतं. खडसेंनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली होती. सध्या रावेर मतदार संघात खडसेंच्या सून भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. आहेत. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी वक्तव्य केलं.

आज पत्रकार परिषदेत बोलतांना गिरीश महाजन म्हणाले की, एकाच कुटुंबात एकनाथ खडसेंना सगळी पदं पाहिजे असतात. त्यांना जिल्हा बँक देखील आपल्याकडेच पाहिजे असते. जिल्हा दूध संघ देखील आपल्याकडेच पाहिजे असतो. आमदारकी सुद्धा त्यांना घरातच पाहिजे असते आणि खासदारकी पाहिजे असते. घरात जेवढे लोक आहेत तेवढी पदं त्यांना घरातच पाहिजे असतात, अशी टीका महाजन यांनी केली.

महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांना सर्व पदे ही घरातल्या घरात पाहिजेत, त्यामुळे खडसे यांनी आता कुटुंबात एकदा ठरवावं की, कोणकोणती पदं कोणी वाटून घ्यायचे आहेत, असा टोला ही महाजन यांनी खडसेंना लगावला आहे.

Boys 4’ चा चौपट धमाका; धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला 

एकनाथ खडसे हे रावेरमधून लोकसभा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तसं सूचक विधानही केले. मी लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसा उत्सुक नाही. मात्र, पक्षाने जबाबदारी सोपविल्यास ती जबाबदारी पार पाडू, असे विधान त्यांनी केलं. त्यानंतर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे रावेरमधून लढले तरी त्या निवडणुकीत रक्षा खडसेच जिंकतील. कारण त्यांनी ज्या पद्धतीने तिथे काम केले आहे, त्यांनी मतदारसंघाचा दौरा केला आहे. त्यामुळे रावेरमध्ये कोणीही लढले तरी रक्षा खडसे विजयी होतील, इतकी त्यांची ताकद आहे.

दरम्यान, एकाच कुटुंबात एकनाथ खडसेंना सगळी पदं पाहिजे असतात या गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला आता खडसे काय प्रत्युत्तर देणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us