Gopichand Padalkar : अजित पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. यावरून आता राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे . दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. […]

Untitled Design (12)

Untitled Design (12)

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. यावरून आता राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे .
Special greetings to Letsup's website : लेट्सअपच्या वेबसाईटला खास शुभेच्छा...|LetsUpp Marathi
दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं पवार म्हणाले होते. पवारांच्या या विधानावर बोलताना पडळकर म्हणाले की, असं म्हणणाऱ्यांची कदाचीत सुंता झाली असती. प्रसारमाध्यमांच्या मित्रांनी जाऊन खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा हा जुना वाद उकरून काढला आहे. संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पडळकरांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. मात्र टीका करत असताना पडळकरांची जीभ घसरली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते. पवारांच्या या वक्तव्यावर भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर हा वाद आता मिटला होता. मात्र आता पडळकरांनी या वादात उडी घेऊन पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?
संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं. संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी विचारला.

Exit mobile version