Download App

Gopichand Padalkar : पवार हे महाराष्ट्राला लागलेली कीड; पडळकरांची जहरी टीका

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. पवार हे महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याचे पडळकर म्हणाले आहेत. यावेळी ते इंदापूर येथे बोलत होते. पडळकर यांनी बोलताना शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी व्यासपीठावर भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते.

मी पवारांचा विरोधात बोलतो कारण पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागलेली आहे. ती मुळापासून काढल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पुणे जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ होता. शेतकऱ्याला जोपर्यंत शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकरी काहीच करु शकत नाही.

सोमय्यांनी केला 12 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राज्यपालांनी दिला ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार

हे एवढे वर्ष राज्याचे नेतृत्व करत आहेत. चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्यामध्ये व देशामध्ये त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष सत्ता होती. पण यांनी राज्याच्या दुष्काळी भागात पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही. हे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे, असे म्हणत पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे.

तसेच ज्यांचे चार खासदार आहेत त्यांना सगळे राष्ट्रीय नेते म्हणतात. त्यांच्यानंतर मायावती आल्या, ममता बॅनर्जी आल्या एवढेच नाही तर अण्णा हजारेंच्या आंदोलनात नाचून केजरीवाल तीन वेळा मुख्यमंत्री झाले पण यांना 100च्यावर आमदार नेता आले नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics : ‘मेव्हण्याला वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा’

दरम्यान, ज्यापार्टीचा 1999 पासून एकच अध्यक्ष आहे ते म्हणत आहे की भारतात लोकशाही नाही. लोकशाही जर मजबूत करायची असेल तर ती फक्त भारतीय जनता पक्षच करु शकतो. तसेच ज्यावेळेला रशिया-युक्रेनचे युद्ध चालू होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी फोन आला. पण इकडे टीव्ही सिरीअलवाल्या बायकांचे भांडण मिटवण्यासाठी शरद पवारांना फोन येतो, असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

Tags

follow us