Maharashtra Politics : ‘मेव्हण्याला वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा’

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 27T130303.385

Suhas Kande Criticize Uddhav Thackeray : मालेगावात झालेल्या कालच्या सभेवरून आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भावनिक आवाहन करणं बंद करावं. ‘मेव्हण्याची ईडी चौकशी बंद होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला असा गौप्यस्फोट सुहास कांदेंनी केला आहे. (Maharashtra Politics) राज्याच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नाही. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर २ दिवसांनी मेव्हण्याची ईडी (ED) चौकशी बंद झाली. यामुळे मेव्हण्याची ईडी चौकशी होऊद्या, दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असेही कांदेंनी म्हटले आहे.

कालची मालेगाव येथील सभा पाहून उद्धव ठाकरेंवर दया आली. पण, या सभेमधून उत्तर महाराष्ट्राने काय घ्यायचं? एकीकडे राहुल गांधींना अपात्र ठरवले म्हणून राज्यभर निषेध करायचा का दुसरीकडे सभेत राहुल गांधी सावरकरांविषयी चुकीचे वक्तव्य केले हे सांगायचं. ही दुट्टपी भूमिका योग्य नाही. ही फक्त टोमणे सभा असल्याची जोरदार टीका आमदार सुहास कांदे यांनी केली.

Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

तर दुसरीकडे खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करण्यात यावी. मी एक ते दोन कंत्राटदारांनी नावं सांगतो, त्यांनी उद्धव ठाकरेंना किती खोके दिले आहेत, यांची देखील नार्को टेस्ट करा. म्हणजे सर्वांना समजू द्या, उद्धव ठाकरेंना किती खोके गेले आहेत.  मी एक रूपया जरी घेतला असेल, तर राजीनामा नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल,” असं आव्हानही सुहास कांदेंनी यावेळी उद्धठ ठाकरेंना दिलं आहे.

‘तुम्ही म्हणताय कांद्याला भाव मिळाला नाही, मी म्हणतो मिळाला. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली, किती खोक्याला एक कांदा गेला. एक कांदा ५० खोक्याला जात असेल, तर तुम्हाला किती खोके, रक्ताचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

Tags

follow us