Narayan Rane On Uddhav Thackeray : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उल्लेख उध्वस्त ठाकरे असा केला आहे. सध्या बारसू येथील रिफायनरीवरुन जोरदार वाद सुरु आहे.
आज उद्धव ठाकरे यांनी आज बारसू येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांशी भेट घेतली आहे. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका असल्याची टीका ठाकरेंनी केली. यानंतर आता पत्रकार परिषद घेत नारायण राणेंनी त्यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे.
सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
ठाकरेंना ते कोण आहेत याची जाणीव आहे का. 40 लोक त्यांना सोडून गेले आहेत. महाराष्ट्रात ते चौथ्या क्रमांकावर आहेत आणि महाराष्ट्र पेटवण्याची भाषा कोणाच्या जीवावर करत आहेत. स्वत:ला दीर्घकाळ चालता येत नाही. कुणावर हात वर करता येत नाही. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात फक्त 2 वेळा मंत्रालयात गेले. त्यामुळे कसं पेटवणार. हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्र पेटवणार का, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
देशातील सर्वात कमी ताकदीचा पक्ष अशी त्यांची अवस्था आहे. कोकणातील प्रत्येक विकासकामाला त्यांनी विरोध केला आहे. ऐनरॉनला विरोध, विमानतळाला विरोध, रस्त्याच्या चौपदरीकरणाला विरोध सगळ्या कामांना यांनी विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम, आस्था आहे की द्वेष आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कॅलिफोर्नियामध्ये असे 14 प्रकल्प आहेत. त्यामुळे त्यांना कशाचीही माहिती नाही, अशा शब्दात राणेंनी ठाकरेंना सुनावले आहे.