उद्धव ठाकरेंनी दोनदा ‘मातोश्री’ला केलं होतं गुडबाय! राणेंनी सांगितली Unseen स्टोरी

Narayan Rane On Udhdhav Thackeray :  भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते सगळ्यांनाच माहिती आहे. हे दोन्ही नेते कायम एकमेकांना पाण्यात पाहतात व एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या एका वक्तव्याने या दोघांमधील वाद पुन्हा एकदा […]

Letsupp Image   2023 06 12T174624.276

Letsupp Image 2023 06 12T174624.276

Narayan Rane On Udhdhav Thackeray :  भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते सगळ्यांनाच माहिती आहे. हे दोन्ही नेते कायम एकमेकांना पाण्यात पाहतात व एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या एका वक्तव्याने या दोघांमधील वाद पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

यावेळी नारायण राणे हे झी मराठी या वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात बोलत होते. राणे यांनी बोलाताना त्यांना शिवसेना का सोडावी लागली याचे कारण सांगितले. माझ्या शिवसेना सोडण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे राणेंनी सांगितले. राणे म्हणाले की, मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा घर सोडलेले आहे. आपल्या कुटुंबासह ते हॉलिडे इन् या पंचतारांकीत हॉटेलमध्ये  राहिलेले होते. दोन्ही वेळेला मी बाळासाहेबांशी बोलून त्यांना परत आणले. हे बाळासाहेबांना फक्त घर सोडण्याची धमकी द्यायचे, असे राणेंनी सांगितले.

खासदाराला प्रश्न विचारले म्हणून पोलिसांनी डांबून ठेवले, माजी सरपंचाचा आरोप; अमोल कोल्हेंकडून इन्कार

राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी आता यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत नारायण राणे यांचा पक्ष सोडतानाचा किस्सा सांगितला होता. यावर देखील राणे यांनी आपले मत या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

दरम्यान, नारायण राणे आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून 39 वर्ष शिवसेनेत होते. त्यानंतर 2005 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2019 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा शिवसेना व भाजप यांच्यात युती असतानादेखील भाजपने त्यांना प्रवेश दिला होता.

Exit mobile version