खासदाराला प्रश्न विचारले म्हणून पोलिसांनी डांबून ठेवले, माजी सरपंचाचा आरोप; अमोल कोल्हेंकडून इन्कार

खासदाराला प्रश्न विचारले म्हणून पोलिसांनी डांबून ठेवले, माजी सरपंचाचा आरोप; अमोल कोल्हेंकडून इन्कार

घोडेगाव : शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना त्यांच्या आंबेगाव दौऱ्यापूर्वी काही प्रश्न विचारल्याने एका माजी सरपंचाला पोलिसांनी तब्बल 5 तास डांबून ठेवले असल्याचा आरोप होत आहे. रामदास भोकटे असं त्यांचं नाव असून ते आसाणे गावचे माजी सरपंच आहेत. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी या माजी सरपंचांची घोडेगाव पोलीस स्थानकातून सुटका केली असंही सांगितलं जात आहे. (former sarpanch was detained by the police for almost 5 hours after asking some questions to Shirur MP Dr. Amol Kolhe before his visit.)

मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे. ही चुकीची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कोल्हे यांच्या कार्यालयाने कळवले की आम्ही गेले दोन दिवस ग्रामीण आणि दुर्गम भागाच्या दौर्यावर आहोत. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर चूकीची माहिती देत आहेत. अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला म्हणून डांबून ठेवण्याचा प्रश्ननच उदभवत नाही.

नेमकं काय झालं?

खासदार अमोल कोल्हे हे आज (12 जून) आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान, ते आसाणे या आदिवासी बहुल गावाला भेट देणार होते. मात्र त्यांच्या या दौऱ्यापूर्वी या गावचे माजी सरपंच रामदास भोकटे यांनी त्यांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रपवर कोल्हे यांना उद्देशून काही प्रश्न विचारले. तसंच या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय कोल्हेंना गावात येऊ देणार नाही, त्यांना काळे झेंडे दाखवू असा इशाराही दिला. यानंतरच पोलिसांनी भोकटे यांना ताब्यात घेऊन त्यांना घोडेगाव पोलीस स्थानकात डांबून ठेवले होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. अर्थात हा आरोप कोल्हे यांनी फेटाळून लावला आहे.

Whatsapp Chat

पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं?

या प्रकरणाबाबत बोलताना आंबेगावचे माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले म्हणाले, प्रचारादरम्यान अमोल कोल्हे यांनी बरीच काही आश्वासन दिली होती. त्यानंतर 70 ते 75 टक्के लोकांनी निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केले. पण गेल्या साडेचार वर्षांमध्ये ते आंबेगाव तालुका, मतदारसंघ आणि आदिवासी पाड्यांमध्ये फिरकलेच नाहीत. त्यानंतर आज पहिल्यांदा त्यांनी दौरा लावला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी लोकांच्या व्हॉट्सअॅ ग्रुपवर चर्चा व्हायला सुरुवात झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube