Nilesh Rane : बिष्णोईकडून राऊतांना धमकी; राणेंकडून जावयाचा उल्लेख करत ट्विट

Nilesh Rane Attack on Sanjay Raut :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला होता व त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 01T155115.077

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 01T155115.077

Nilesh Rane Attack on Sanjay Raut :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला होता व त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होत होते.

यानंतर पोलिसांनी आपली चक्र फिरवत या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी राहुल तळेकर हा 23 वर्षाचा असून त्याचा कुठल्याही गॅंगशी संबंध नाही. आरोपी यांचं कुठलंही क्रिमिनिल रेकॉर्ड नाही. त्याने फक्त लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्याने काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ पाहिला होता. लॉरेन्सचा व्हिडिओ पाहून आरोपी तळेकर यांने राऊत यांना धमकी दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

राऊत धमकी प्रकरणातील आरोपीचा कुठल्याही गॅंगशी संबध नाही; पोलिसांची माहिती

यावरुन आता भाजपचे नेते निलेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे. निलेश राणे यांनी एकेरी भाषेमध्ये राऊतांचा उल्लेख केला आहे. तसेच यावेळी त्यांनी थेट राऊतांच्या जावयाच उल्लेख केला आहे.   संज्या राऊत तुझा जावई तुझी दाखल घेत नसेल तर बिष्णोई कुठून घेणार?? असे म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

“एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस” राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मला आलेल्या धमकीनंतर मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयीची माहिती दिली आहे. पण त्यांनी या विषयाची चेष्टा केली. जेव्हा एखाद्या वरिष्ठ लोकप्रतिनिधी अशा प्रकारची माहिती देतो तेव्हा तुम्ही त्याची चेष्टा करता. हा कोणता प्रकार राज्यामध्ये सुरु आहे. तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्यावर या राज्याची जबाबदारी आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना सुनावले आहे.

Exit mobile version