Vinod Tawde on Poonam Mahajan : उत्तर मध्य मुंबईच्या भाजपच्या खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्याऐवजी भाजपने वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी दिली. महाजन यांना डावलल्याने उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. गद्दारांच्या मुलांना उमेदवारी मिळते, मात्र भाजपसाठी आयुष्य घालणाऱ्या महाजनांच्या मुलीला उमेदवारी मिळत नाही, अशी टीका ठाकरेंनी केली. दरम्यान, आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
शाहरुख आणि करण जोहर समलैंगिक संबंध ठेवायचे, गायिकेने केला खळबळजनक दावा
पूनम महाजन यांच्या भवितव्यासाठी पक्षाने वेगळा निर्णय केला असावा, असं तावडे म्हणाले.
तावडेंनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
पूनम महाजन दोन वेळा खासदार म्हणून निवडणूक आल्या. मात्र त्यांचं तिकीट कापून निकमांना का संधी देण्यात आली? मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढवू शकतात, तर पूनम महाजन यांनी काय पाप केले आहे? असा सवाल तावडे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना तावडेंनी 2019 त्यांचेत तिकीट कसं कापण्यातआलं होतं हे सांगितलं.
RTE Admission 2024: आरटीई परिक्षेची प्रक्रिया सुरु, पुण्यामधून सर्वाधिक अर्ज
तावडे म्हणाले, प्रत्येक नेत्याविषयी पक्षाची काहीतरी योजना असते. मला देखील 2019 मध्ये तिकीट नाकाण्यात आलं होतं. मात्र, आज मी पक्षात एका पदावर काम करत आहे. त्याचप्रमाणे पूनम किंवा मनोज कोटक यांच्याबद्दलली पक्षाचं काहीतरी नियोजन असू शकतं. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री न करता पुढं काय करायचं? याची योजना आधीच तयार केलेली असते. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे 70 वर्षांच्या आहेत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे की नवीन कुणाला संधी द्यायची? हा प्रश्न असतो. शिवराज चौहान 18 वर्षे मुख्यमंत्री होते, त्यामुळे नवीन माणूस आणलाच पाहिजे, असं तावडे म्हणाले.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनाही राज्यसभेत आणून त्यांचा उपयोग करून घेतला जाणार होता. पूनम आणि इतर नेत्यांबद्दल पक्ष काहीतरी विचार करणार असेल, असंही तावडे म्हणाले.
उज्ज्वल निकम, नवनीत राणा यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्याची नामुष्की भाजपवर का आली? याबाबत विचारले असता तावडे म्हणाले की, भाजपच्या मुळ नेत्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार आशिष शेलार यांनी लोकसभा लढण्यास नकार दिला आहे. पुढील पाच वर्षे राज्यात काम करण्याची संधी मिळावी, अशी सबब त्यांनी पुढे केली असल्याचं तावडे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना तावडे म्हणाले की, भाजप 340 ते 355 जागा जिंकेल. देशात 160 जागा अशा आहेत जिथे भाजपला कधीही विजय मिळाला नाही. त्या जागांपैकी भाजप 60 ते 65 जागा जिंकेल, असं तावडे म्हणाले.