Download App

Maharashtra Politics : ‘इच्छुकांचे जीव टांगणीला’ ! शिंदे फडणवीस दिल्लीला

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत  (Delhi) बैठकांमध्ये नेमकी काय सुरू आहे, याकडे संपूर्ण  महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी लवकरच बातमी धडकणार की आणखी काही मोठी  घडामोड घडणार, यावरून सध्या चर्चा सुरु आहे. शिंदे -फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यातून महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता दिल्लीत जोरदार बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत याविषयी महत्त्वाची बैठक सुरु आहे. महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर मागील अनेक वर्षांपासून प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पकड आहे. ही वर्चस्व मोडून काढण्याकरिता भाजप पुढील काळात मोठी खेळी खेळणार असल्याचे सांगितलं जात आहे. यासाठी राज्यात साखर उद्योगातील बडे नेतेदेखील आज दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. यात मराठवाड्यातील पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह धनंजय महाडीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित आहेत.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातील सहाकाराबाबत नेमकी काय रणनीती ठरणार आहे, याकडे संपूर्ण लक्ष लागलं आहे. अमित शाह यांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात दुपारी ४ वाजता ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सहकार धोरणाचे विधेयक, सहकारातील मल्टीस्टेट कायदा, देशभरातील साखर धोरण यासंबंधी महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे.

Tags

follow us