Minister Nitesh Rane Said I Drink Lot Of Cow Urine : महाराष्ट्रातील मत्स आणि बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. उन्हाळा आहे, तर तुम्ही काय पिता? रूआवजा की गुलाब सरबत? यावर भाजप (BJP) नेते नितेश राणे यांनी म्हटलंय की, मी गोमूत्र फार पितो. आणि मी तुम्हाला सांगतो की, तब्येतीसाठी ते खूप चांगलं आहे, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय.
गुलाब सरबत अन् रूआवजा कोण देतं, यावर ते अवलंबून असल्याचं मिष्कीलपणे नितेश राणे यांनी ( Maharashtra Politics) म्हटलंय. त्यांनी म्हटलं की, मला रूआवजा कोणी चांगल्या मनाने प्यायला देणार नाही. ते खूप गोड आहे. त्यामुळं ते आवडत नसल्याचं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं.
आम्ही 39 वर्ष शिवसेनेसोबत होतो. आमच्यावर सातत्याने आरोप होतो की, तुम्ही सारखे सारखे पक्ष बदलता. परंतु आमच्यासोबत जर घाणेरडं राजकारण झालं नसतं, तर आज देखील आम्ही शिवसेनेसोबत असतो. आमचं रक्त भगवं आहे, कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेत हिंदुत्वाखालीच वाढलेलो आहे. आम्ही बारा वर्ष कॉंग्रेसमध्ये काढले कारण, आमच्यासमोर कोणता दुसरा पर्यायच नव्हता, असं देखील त्यांनी म्हटलंय. तेव्हा देखील आमच्या रक्ताचा रंग भगवाच होता. आता तर भाजपमध्ये आल्यानंतर आम्ही गर्वाने सांगतो की, आमचं रक्त भगव्या रंगाचं आहे.
खरं बोलायची सवय आहे, लोकांना ते ऐकायला आवडत नाही. कधी-कधी माझं सत्य इतकं कडू असतं. मी खरी परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करतो. काहीही काल्पनिक नसतं, त्यामुळं वाद निर्माण होतो. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. शिवरायांना माननारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला औरंगजेबामुळे संताप होतोच, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय.
प्रत्येक पुरुषाचा फोटो काढा अन् घरच्यांना पाठवा; पिंक रिक्षा वाटपावेळी अजितदादांच्या ‘सेफ्टी टिप्स’
आम्हाला देखील इच्छा नाही की, आमच्या राज्यात विवाद व्हावा. याप्रकरणी संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागपुरात हिंसाचार झाला, एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भाजपनेच या हिंसाचाराला मोठं केलं, असा आरोप विरोधक करत आहे. यावर नितेश राणे यांनी म्हटलं की, संघाची भूमिका आहे की, आज औरंगजेबाबाबत बोलायची गरज नाही. त्यामुळे आम्ही शांत झालो, असं त्यांनी म्हटलंय.